Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मदनलाल खुराणा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून दु:ख व्यक्त


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री मदनलाल खुराणा यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

‘मदनलाल खुराणा यांच्या निधनाने दु:ख होत आहे. त्यांनी दिल्लीच्या विकासासाठी, विशेषत: अधिक चांगल्या पायाभूत सुविधांसाठी अथक प्रयत्नांती कार्य केले आहे. दिल्ली तसेच केंद्र सरकारमध्ये त्यांनी कष्टाळू आणि लोकाभिमुख प्रशासक म्हणून वेगळी ओळख निर्माण केली.

दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टी मजबूत होण्यासाठी खुराणा यांनी केलेले कार्य कायम स्मरणात राहील. फाळणीनंतर दिल्लीत आलेल्या निर्वासितांच्या सेवेसाठी त्यांनी कठोर परिश्रम केले. त्यांचे कुटुंबिय आणि अनुयायी यांच्याप्रती माझ्या सहसंवेदना!’ असे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

 

 

  1. Gokhale/J. Patankar/D. Rane