Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भ्रष्टाचार, दहशतवाद आणि काळ्या पैशाविरुद्ध सुरु केलेल्या यज्ञात मनापासून सहभागी झाल्याबद्दल पंतप्रधानांचे जनतेला अभिवादन


भ्रष्टाचार, दहशतवाद आणि काळ्या पैशाविरुद्ध सुरु असलेल्या यज्ञात मनापासून सहभागी झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला अभिवादन केले आहे. सरकारच्या विमुद्रीकरणाच्या निर्णयाचे फायदे पंतप्रधानांनी ट्विटरवरुन सांगितले. रोकडमुक्त व्यवहार वाढविण्याचे आणि आर्थिक व्यवहारांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे.
“भ्रष्टाचार, दहशतवाद आणि काळा पैसा याविरुद्ध सुरु असलेल्या यज्ञात मनापासून सहभागी झाल्याबद्दल मी भारतीय जनतेला अभिवादन करतो.

आपल्या देशाचा आर्थिक कणा असलेले शेतकरी, व्यापारी आणि मजूर यांना या निर्णयाचा फायदा झाला आहे.

मी सुरुवातीलाच सांगितले होते सरकारच्या उपायांमुळे काहीसा त्रास होईल पण हा अल्पावधीचा त्रास पुढे मोठ्या सफलतेकडे घेऊन जाणार आहे.

यापुढे ग्रामीण भारताच्या प्रगती आणि समृद्धीच्या आड भ्रष्टाचार आणि काळा पैसा येणार नाही. आपल्या गावांना त्यांचा न्याय हक्क मिळालाच पाहिजे.

रोकडमुक्त व्यवहार सुरु करण्यासाठी आणि आर्थिक व्यवहार अद्ययावत तंत्रज्ञानाने सुरु करण्यासाठी ही ऐतिहासिक संधी आहे.

माझ्या तरुण मित्रांनो, तुम्ही बदलाचे दूत आहात. तुम्ही असे दूत आहात जे देश भ्रष्टाचारमुक्त करतील.

एकत्रपणे आपण काळ्या पैशाविरुद्धची लढाई जिंकू. यामुळे गरीब, निम्न मध्यम वर्ग आणि मध्यम वर्ग सक्षम होईल आणि त्याचा फायदा पुढच्या पिढ्यांना होईल” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/S.Kulkarni/P.Malandkar