पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने दहा (10) जीएसएलव्ही (एमके-3) फ्लाइटचा समावेश असलेल्या भौगोलिक उपग्रह प्रक्षेपण वाहक मार्क-3 (जीएसएलव्ही एमके-3) कार्यक्रम (फेज -1) सुरु ठेवण्यासाठी 4338.20 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, यात दहा जीएसएलव्ही एमके-3 व्हेइकल्सचा खर्च, आवश्यक सुविधा वाढवणे, कार्यक्रम व्यवस्थापन आणि प्रक्षेपण मोहीम यांचा समावेश आहे.
जीएसएलव्ही एमके -3 कार्यक्रम सुरु ठेवणे – पहिल्या टप्प्यात देशाच्या उपग्रह दळणवळण गरजा पूर्ण करण्यासाठी ४ टन वजनाचे उपग्रह प्रक्षेपित करता येतील.
जीएसएलव्ही एमके -3 कार्यान्वित झाल्यामुळे देश ४ टन वजनाचे उपग्रह प्रक्षेपित करण्यात स्वयंपूर्ण होईल.
***
B.Gokhale/S.Kane/D.Rane