पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारत आणि ब्राझिल यांच्यात भूविज्ञान आणि खनिज संसाधन या क्षेत्रात सहकार्य करण्याबद्दल झालेल्या सामंजस्य कराराला मंजुरी देण्यात आली. भारतीय भूविज्ञान सर्वेक्षण संस्था आणि ब्राझिलची भूविज्ञान संस्था, सीपीआरएम यांच्यात हा करार करण्यात आला.
या करारामुळे खनिज मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी भूविज्ञान संस्था आणि ब्राझिलच्या सीपीआरएम या संस्थेदरम्यान संस्थात्मक यंत्रणेचे आदानप्रदान करणे शक्य होईल.
**********
S.Tupe/R.Aghor/P.Kor