भूतानमधील 1020 मेगावॅट ऊर्जा क्षमतेच्या पुनतसंगच्चू-2 या औष्णिक ऊर्जा प्रकल्पाच्या 7290.62 कोटी रुपये इतक्या सुधारित अनुमानित खर्चाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. आतापर्यंत या प्रकल्पाच्या खर्चात 3512.82 कोटी रुपये इतकी वाढ झाली आहे.
या प्रकल्पातून प्राप्त होणारी अतिरिक्त ऊर्जा भारताला मिळणार असून त्यामुळे भारताच्या ऊर्जा उपलब्धतेत वाढ होणार आहे.
M.Pange/B.Gokhale