Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत-सिंगापूर संयुक्त मंत्रिस्तरीय प्रतिनिधीमंडळाने घेतली पंतप्रधानांची भेट


नवी दिल्‍ली, 19 सप्‍टेंबर 2022

 

सिंगापूरचे उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री लॉरेन्स वोंग, सिंगापूरचे व्यापार आणि उद्योग मंत्री  गुन किम योंग आणि भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा समावेश असलेल्या  भारत-सिंगापूर संयुक्त मंत्रीस्तरीय प्रतिनिधीमंडळाने आज  पंतप्रधानांची भेट घेतली. नवी दिल्ली येथे आज 17 सप्टेंबर 2022 रोजी आयोजित भारत-सिंगापूर मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेच्या (आयएसएमआर ) उद्घाटन सत्राच्या फलश्रुतीबाबत त्यांनी  पंतप्रधानांना माहिती दिली.  लॉरेन्स वोंग यांची उपपंतप्रधान म्हणून ही पहिलीच भारत भेट आहे.

भारत-सिंगापूर मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेची  स्थापना हा एक पथदर्शक उपक्रम आहे.  या उपक्रमामागची संकल्पना  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली होती आणि भारत-सिंगापूर द्विपक्षीय संबंधांचे वैशिष्ठ्यपूर्ण  स्वरूप ती प्रतिबिंबित करते. प्रतिनिधीमंडळाने विस्तृत चर्चेची  विशेषत: डिजिटल कनेक्टिव्हिटी, फिनटेक, हरित अर्थव्यवस्था, कौशल्य विकास आणि अन्न सुरक्षा या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये झालेल्या विस्तृत चर्चेची माहिती पंतप्रधानांना दिली.

पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले आणि आयएसएमआरसारख्या उपक्रमांमुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होण्यास मदत होईल,अशी आशा व्यक्त केली. पंतप्रधानांनी सिंगापूरचे पंतप्रधान ली आणि सिंगापूरच्या जनतेसाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

 

* * *

R.Aghor/S.Kakade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai