Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत-व्हिएतनाम नेत्यांची आभासी शिखर परिषद

भारत-व्हिएतनाम नेत्यांची आभासी शिखर परिषद


नवी दिल्ली, 21 डिसेंबर 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिएतनामचे पंतप्रधान नुग्येन झुआन फुक यांच्यासमवेत आभासी शिखर परिषद घेतली. दोन्ही नेत्यांनी सध्या सुरु असलेल्या द्विपक्षीय सहकार्य उपक्रमांचा आढावा घेतला आणि प्रादेशिक आणि जागतिक मुद्यावर चर्चा केली. या परिषदेत ‘शांतता, समृद्धी आणि जनता यांच्यासाठी संयुक्त दृष्टीकोन’ दस्तावेजाचा स्वीकार करण्यात आला, भारत- व्हिएतनाम सर्व समावेशक धोरणात्मक भागीदारीबाबत भविष्यातल्या प्रगतीसाठी हा दस्तावेज मार्गदर्शन करेल. संयुक्त दृष्टीकोनाची अंमलबजावणी करण्यासाठी 2021-2023 या काळासाठी कृती आराखड्यावर स्वाक्षरी करण्याचे उभय नेत्यानी स्वागत केले.

सर्व क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वृद्धिगत करण्याचे महत्व त्यांनी अधोरेखित केले. परस्परांच्या राष्ट्रीय विकासाच्या प्राधान्याना  सहकार्य करण्याला आणि शांततापूर्ण, स्थिर, सुरक्षित, मुक्त, नियमाधरीत इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी एकत्र  काम करण्यालाही दोन्ही नेत्यांनी मान्यता दिली.

कोविड-19 महामारीसह सामायिक जागतिक आव्हानांसदर्भात सहकार्य दृढ करण्याप्रतीच्या आपल्या कटिबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला. महामारीवरच्या लसी बाबत सक्रीय सहकार्य राखण्यालाही नेत्यांनी मान्यता दिली. विविध जागतिक आणि प्रादेशिक मुद्याबाबत  आदान-प्रदानाच्या आधारावर, संयुक्त राष्ट्रसुरक्षा परिषदेसह  विविध बहु पक्षीय मंचावर भारत आणि व्हिएतनाम घनिष्ट  सहकार्य राखतील असा निर्णय या नेत्यांनी घेतला. 

इंडो- पॅसिफिक महासागर उपक्रमावर आधारित सागरी क्षेत्रात नव्या आणि वास्तविक सहयोगाच्या संधीचा शोध घेण्याला उभय पंतप्रधानांनी मान्यता दर्शवली. विएतनामसमवेत भागीदारी क्षमता उभारण्यासाठी आणि विकासासाठी भारताच्या कटीबद्धतेच पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. क्विक इम्पॅक्ट प्रोजेक्ट, आयटीईसी, ई-आयटीईसी उपक्रम, डिजिटल कनेक्टीव्हिटी आणि वारसा जतन प्रयत्न या उपक्रमांचा यात समावेश आहे.

भारताने व्हिएतनामला देऊ केलेल्या 100 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सच्या कर्जाबाबत यशस्वी अंमलबजावणीची  दोन्ही पंतप्रधानांनी प्रशंसा केली. तसेच व्हिएतनाममधल्या निंन्ह थूआन प्रांतातल्या स्थानिक जमातीच्या लाभासाठीच्या भारताच्या सहाय्याने पूर्ण झालेल्या सात विकास प्रकल्पांच्या पूर्ततेचीहि त्यांनी प्रशंसा केली.

व्हिएतनाममधल्या माय सन मंदिराच्या जीर्णोद्धार आणि जतन कामाबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले, भारतीय पुरातत्व खात्याच्या सहाय्य्याने हे काम नुकतेच करण्यात आले आहे. व्हिएतनाममधे अशाच प्रकारच्या कार्यासाठी मदतीची  तयारी त्यांनी दर्शवली.

 

* * *

M.Chopade/N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com