नवी दिल्ली , 18 जानेवारी 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाला, 21 नोव्हेंबर 2023 रोजी भारत सरकार आणि युरोपियन कमिशन यांच्यात,भारत -युरोपियन महासंघाच्या व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेच्या (टीटीसी) चौकटी अंतर्गत सेमीकंडक्टर कार्यक्षेत्र, संबंधीत पुरवठा साखळी आणि नवोन्मेष यासंदर्भातील कार्य व्यवस्थेच्या दृष्टीने, झालेल्या सामंजस्य कराराची माहिती देण्यात आली.
तपशील :
उद्योग आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या अनुषंगाने, सेमीकंडक्टर क्षेत्राच्या वाढीसाठी भारत आणि युरोपीय महासंघ यांच्यातील सहकार्य बळकट करण्याचा या सामंजस्य कराराचा मानस आहे.
अंमलबजावणी धोरण आणि उद्दिष्टे :
हा सामंजस्य करार स्वाक्षरीच्या तारखेपासून अंमलात येईल आणि जोपर्यंत दोन्ही बाजूंनी या करारनाम्याची उद्दिष्टे साध्य झाली आहेत याची खात्री करेपर्यंत किंवा एक बाजू या करारनाम्यांमधील सहभाग थांबवेपर्यंत हा करार कायम राहू शकेल .
प्रभाव :
जी2जी आणि बी2बी ही दोन्ही द्विपक्षीय सहकार्य सेमीकंडक्टर पुरवठा साखळींच्या लवचिकतेला चालना देण्यासाठी आणि सेमीकंडक्टरच्या क्षेत्रात सहकार्याला चालना देण्यासाठी पूरक सामर्थ्याचा लाभ घेता येणार आहे.
पार्श्वभूमी :
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने सक्रियपणे काम करत आहे.भारतातील सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले उत्पादन कार्यक्षेत्राच्या विकासासाठी एक बळकट आणि शाश्वत सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले कार्यक्षेत्राचा विकास सुनिश्चित करण्यासाठी कार्यक्रम सुरू करण्यात आला. सेमीकंडक्टर फॅब्स, डिस्प्ले फॅब्स, कंपाऊंड सेमीकंडक्टर्स/सिलिकॉन फोटोनिक्स/सेन्सर्स/डिस्क्रिट सेमीकंडक्टर्स आणि सेमीकंडक्टर असेंब्ली, टेस्टिंग, मार्किंग आणि पॅकेजिंग (एटीएमपी )/आउटसोर्स्ड सेमीकंडक्टर असेंब्ली आणि टेस्ट (ओएसएटी ) सुविधांच्या स्थापनेसाठी आर्थिक पाठबळ देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. देशातील सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले उत्पादन कार्यक्षेत्राच्या विकासासाठी भारताच्या धोरणांना चालना देण्याच्या अनुषंगाने डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन (डीआयसी ) अंतर्गत इंडिया सेमीकंडक्टर अभियानाची (आयएसएम ) स्थापना करण्यात आली आहे.
द्विपक्षीय आणि प्रादेशिक चौकटी अंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञानाच्या उदयोन्मुख आणि आघाडीच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय कार्यरत आहे. या उद्देशाने, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने द्विपक्षीय सहकार्य आणि माहितीच्या देवाणघेवाणीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि भारत विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयाला येण्यासाठी पुरवठा साखळीतील लवचिकता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने विविध देशांच्या समकक्ष संस्था/एजन्सींसोबत सामंजस्य करार/सहकार्य करार/करार केले आहेत.
N.Meshram/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai