इस्रो आणि संयुक्त अरब अमिरातीची अंतराळ संस्था, युएईएसए यांच्यात शांततापूर्ण कार्यासाठी बाह्य अंतराळ संशोधन आणि उपयोगासाठीच्या सहकार्याबाबत झालेल्या सामंजस्य कराराची केंद्रीय मंत्रिमंडळाला माहिती देण्यात आली. या सामंजस्य कराराद्वारे इस्रो आणि युएईएसएच्या सदस्यांचा संयुक्त कृती गट स्थापन करण्यात येईल. या कराराची कालबद्ध अंमलबजावणी करण्याचा आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने हा गट काम करणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑगस्ट 2015 मधल्या संयुक्त अरब अमिराती भेटीदरम्यान तसेच नवी दिल्लीत सप्टेंबर 2015 मधे आर्थिक आणि तांत्रिक सहकार्यविषयक भारत आणि युएई संयुक्त आयोगाच्या अकराव्या बैठकीत भारत-युएई यांच्यातल्या अंतराळ सहकार्यावर भर देण्यात आला होता.
N. Chitale / B. Gokhale