Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत-मॉरिशस सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मान्यता


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारत आणि मॉरिशस यांच्या दरम्यान झालेल्या सामंजस्य कराराला मान्यता देण्यात आली.

या करारामुळे ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी आणि कार्यक्षमता वृद्धीसाठी उभय देशांना लाभ होणार आहे. या करारानुसार ग्रामीण विकास सहकार्यासाठी संयुक्त समिती नियुक्त करण्यात येणार आहे. ग्रामीण विकासासाठी आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.

S.Bedekar/B.Gokhale