Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत-मध्य पूर्व युरोप आर्थिक कॉरिडॉरचे सक्षमीकरण आणि परिचालन सहकार्यासाठी भारत आणि संयुक्त अरब अमिराती दरम्यानच्या आंतर-सरकारी आराखडा कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


नवी दिल्‍ली, 13 मार्च 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज 13 फेब्रुवारी 2024 रोजी भारत-मध्य पूर्व युरोप आर्थिक कॉरिडॉरच्या (आयएमईसी) सक्षमीकरण आणि परिचालन सहकार्यासाठी भारत सरकार आणि संयुक्त अरब अमिराती सरकार यांच्यातील उच्चस्तरीय भेटीदरम्यान स्वाक्षरी केलेल्या आंतर-सरकारी आराखडा कराराला (आयजीएफए) कार्योत्तर मान्यता दिली. द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करणे आणि बंदरे, सागरी आणि लॉजिस्टिक क्षेत्रातील उभय देशांमधील संबंध अधिक दृढ करणे हे आयजीएफए चे उद्दिष्ट आहे.

आयएमईसी च्या विकासाच्या संदर्भात भविष्यातील संयुक्त गुंतवणुकीच्या आणि सहयोगाच्या आणखी संधींचा धांडोळा घेण्याच्या उद्देशाने उभय देशांमधील सहकार्याच्या क्षेत्रांचा आयजीएफए मध्ये समावेश आहे.

या करारामध्ये दोन्ही देशांमधील सहकार्याबाबतचा विस्तृत आराखडा आहे. हे सहकार्य देशांच्या अधिकारक्षेत्रातील संबंधित नियम आणि नियमनाशी सुसंगत तत्त्वे, मार्गदर्शक तत्त्वे आणि करारांवर परस्पर सहमत असलेल्या संचावर आधारित असेल.

 

* * *

S.Patil/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai