पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरिया प्रजासत्ताकच्या फस्ट लेडी किम जंग सुक यांची आज नवी दिल्लीत भेट घेतली.
त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आमंत्रणावरून भारताच्या दौऱ्यावर आल्या आहेत. उत्तर प्रदेश सरकारने आयोजित केलेल्या दीपोत्सव कार्यक्रमाच्या त्या प्रमुख पाहुण्या राहणार असून दि.8 नोव्हेंबर 2018 रोजी अयोध्या येथे राणी सुरीरत्न (हिओ व्हाँग-ओक) यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमातही सहभागी होणार आहेत. अयोध्या आणि कोरिया यांचे ऐतिहासिक, सखोल संबंध आहेत. अयोध्येच्या राणी सुरीरत्न यांनी कोरियाला ख्रिस्त इरा 48 मध्ये भेट देऊन कुरियन राजा सुरो यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या होत्या.
पंतप्रधानांनी आजच्या बैठकीत फस्ट लेडी किम यांच्याशी भारत-कोरिया अध्यात्मिक, नागरी विषयांवर सखोल चर्चा केली आणि लोकांमध्ये परस्पर संवाद वाढावा यासाठी विचारांची देवाणघेवाण केली.
फस्ट लेडी किम यांनी सेऊल शांतता पुरस्काराने पंतप्रधानांना गौरवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. यावेळी अभिव्यक्त होतांना पंतप्रधान म्हणाले की, हा सन्मान खरं तर भारतीय लोकांचा आहे.
जुलै 2018 मध्ये राष्ट्राध्यक्ष मून जाए यांनी भारताला यशस्वी भेट दिल्याचा प्रसंग स्मरून भारत-कोरियाने विशेष धोरणात्मक भागीदारीला उजाळा दिला असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
B.Gokhale/P.Kor