भारत आणि ब्रिटन यांच्यात ऊर्जा क्षेत्रातील सहकार्याबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्याची केंद्रीय मंत्रिमंडळाने पूर्वलक्षी प्रभावाने मंजुरी दिली.
या कराराअंतर्गत सहकार्य करण्यात येणाऱ्या क्षेत्रांमध्ये, बाजार सुधारणा, वीज पुरवठा आणि वितरणामध्ये नियामक व्यवस्था आणि स्पर्धा, पुनर्नवीकरणीय ऊर्जेच्या वापरासाठी प्रोत्साहन आणि पुनर्नवीकरणीय ऊर्जा ग्रिडशी जोडणे यांचा समावेश आहे.
त्याचप्रमाणे, औद्योगिक ऊर्जा कार्यक्षमता आणि वाहन इंधन कार्यक्षमतेसह ऊर्जा कार्यक्षमता धोरण आणि व्यवस्था, अपतटीय पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जा, स्मार्ट ग्रिड, ऊर्जेची साठवणूक, नवीन ऊर्जा तंत्रज्ञान, पुनर्नवीकरणीय ऊर्जा संस्थांची क्षमता निर्मिती, ऑफ ग्रिड पुनर्नवीकरणीय ऊर्जा सेवा आणि समुद्राच्या लाटांपासून ऊर्जानिर्मिती या अन्य क्षेत्रांतही सहकार्य करण्याचा उद्देश आहे.
हा सामंजस्य करार तांत्रिक सहकार्यासाठी एक अनुकूल आराखडा प्रदान करेल, ज्यात ब्रिटनने पुढाकार घेतलेल्या संबंधित प्रकल्पांच्या माध्यमातून परस्पर सहमतीद्वारे वस्तू स्वरुपात अनुदान आणि अन्य सहाय्य यांचा समावेश असेल. ऊर्जा सुरक्षा आणि पुरवठयाची विश्वासार्हता सुधारण्यासाठी हा कार्यक्रम केंद्र आणि राज्य पातळीवर काम करेल आणि ऊर्जेचा वापर सुधारण्याबरोबरच शाश्वत आर्थिक विकास सुकर करेल.
S.Kane/S.Tupe/M.Desai