Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत- बांगलादेश यांच्यातील आभासी द्विपक्षीय शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधानांचे निवेदन

भारत- बांगलादेश यांच्यातील आभासी द्विपक्षीय शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधानांचे निवेदन


 

सन्माननीय पंतप्रधान महोदया, शेख हसीना जी, नमस्कार !

विजय दिवसानिमित्त अभिनंदन आणि पौष पर्वाच्या शुभेच्छा!

(बिजोय दिबशेर औनेक औनेक ओभीनोंदन आर पोश पार्बोनेर शुबेच्छा !)

आज सगळे जगच आभासी स्वरुपातल्या शिखर परिषदा घेत आहे. मात्र आपल्या दोघांसाठी हे माध्यम नवे नाही. कित्येक वर्षांपासून आपण व्हिडीओच्या माध्यमातून परस्पर संवाद करतो आहोत.

अनेकदा आपण व्हिडीओ च्या माध्यमातून कित्येक प्रकल्पांचा शुभारंभ आणि उद्घाटनही केले आहे.

 

मान्यवर महोदया,

विजय दिवसानंतर लगेचच होणारी आपली भेट विशेष महत्वाची आहे.

मुक्ती-चळवळ विरोधी शक्तींविरोधात बांग्लादेशाने मिळवलेला ऐतिहासिक विजय आपल्यासोबत आमचाही विजय दिवसम्हणून साजरा करणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.

आज जेव्हा बांगलादेश आपल्या स्वातंत्र्याची 49 वर्षे साजरी करतो आहे, त्यावेळी मी दोन्ही देशांमधले शहीद- ज्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले- त्यांना श्रद्धापूर्वक वंदन करतो.

विजय दिवसनिमित्त काल मी भारतात राष्ट्रीय युद्ध स्मारकात वीरांना श्रद्धांजली अर्पण केली आणि एक सुवर्ण विजय मशालप्रज्वलित केली.

या चार विजय मशाली संपूर्ण भारतभर भ्रमण करतील, आमच्या शहिदांच्या गावागावात त्या नेल्या जातील.

16 डिसेंबर पासून आम्ही स्वर्णिम विजय वर्ष साजरे करत आहोत. ज्याअंतर्गत देशभरात अनेक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

 

मान्यवर महोदया,

मुजीब बर्षोनिमित्त मी सर्व भारतीयांच्या वतीने आपल्याला शुभेच्छा देतो.

पुढच्या वर्षी बांगलादेश भेटीच्या आपण दिलेल्या निमंत्रणाबद्दल आपले आभार व्यक्त करतो. आपल्यासोबत वंगबंधूना श्रद्धांजली अर्पण करणे माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब असेल.

 

मान्यवर महोदया,

आमच्या शेजारी प्रथमया धोरणाचा बांग्लादेश एक प्रमुख स्तंभ आहे. बांगलादेशासोबतचे सबंध अधिक दृढ आणि सखोल करणे माझ्यासाठी पहिल्या दिवसापासून प्राधान्याचा विषय राहिला आहे.

कोरोना महामारीमुळे हे वर्ष आव्हानात्मक होते ही वस्तुस्थिती आहे.

मात्र समाधानाची बाब ही आहे की या कठीण स्थितीत भारत आणि बांगलादेशादरम्यानचे सहकार्य चांगले होते.

मग ती औषधे असतील अथवा वैद्यकीय उपकरणे किंवा मग आरोग्य व्यावासायिकांसोबत काम करणे असो… अगदी लशीच्या क्षेत्रातही आमच्यात चांगले सहकार्य आहे. या बाबतीत आपल्या आवश्यकतांकडेही आम्ही विशेष लक्ष देऊ.

सार्क आराखड्याअंतर्गत बांग्लादेशने दिलेल्या योगदानाबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो.

आरोग्याव्यतिरिक्त इतर क्षेत्रांमधेही या वर्षी आमची विशेष भागीदारी सातत्याने पुढे जात आहे.

जमिनीवरुन होणाऱ्या सीमापार व्यापारातील अडचणी देखील आम्ही कमी केल्या आहेत. दोन्ही देशांमधले दळणवळण आणि संपर्काच्या साधनांचा आम्ही विस्तार केला, नवी साधने निर्माण केली.

हे आमचे परस्पर संबंध अधिक मजबूत करण्याचा आमचा दृढसंकल्प दर्शवणारे आहे.

 

मान्यवर महोदया,

मुजीब चिरंतर’ – हा वंगबंधू शेख मुजीबुर रेहमान यांचा संदेश चिरंतन आहे आणि याच भावनेने आम्ही त्यांच्या वारशाचा सन्मान करतो आहोत. 

आपल्या उत्तम नेतृत्वात वंगबंधूंचा हा वारसा स्पष्टपणे झळकतो आहे. त्यासोबतच, आमच्या द्वीपक्षीय संबंधांसाठीची आपली वैयक्तिक कटिबद्धता ही प्रतीत होते.

आज आपल्यासोबत, वंगबंधू यांच्या सन्मानार्थ एका टपाल तिकीटाचे प्रकाशन करण्याची तसेच महात्मा गांधी आणि वंगबंधू यांच्यावरील डिजिटल प्रदर्शनाचे उद्घाटन करण्याची संधी मिळणे माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. मला आशा आहे की बापू आणि वंगबंधू यांच्यावरील हे प्रदर्शन आपल्या युवकांना प्रेरणा देईल. यातील एक विभाग कस्तुरबा गांधी आणि पूजनीय बंगमाता यांनाही समर्पित करण्यात आला आहे.

 

मान्यवर महोदया,

आता मी आपल्याला प्रारंभिक निवेदन करण्यासाठी आमंत्रित करु इच्छितो.

***

M.Chopade/R.Agor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com