Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत बदलतो आहे कारण भारतीयांनी बदलण्याचा निश्चय केला आहे- सूरत येथे झालेल्या नव भारत युवा परिषदेत पंतप्रधानांचे प्रतिपादन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सूरत येथे नव भारत युवा परिषदेत युवकांशी संवाद साधला.

आज भारतात आमूलाग्र परिवर्तन होत आहे. देशातल्या लोकांनी बदल घडवण्याचा निश्चय केल्यामुळेच देश बदलतो आहे असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले. काहीच होणार नाही आणि कसलाच बदल होणार नाही ही मानसिकता बदलते आहे आणि त्याचे दृश्य परिणाम आपल्याला दिसत आहेत असे पंतप्रधान म्हणाले.

भारताच्या वाढलेल्या शक्तीविषयी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, “मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर काहीही झाले नाही मात्र आमच्या कार्यकाळात उरी येथे हल्ला झाला. त्या हल्ल्याचा बदला घेतला गेला. हा बदल आज देशात झाला आहे. देशाच्या जवानांच्या हृदयात जी ज्वाला होती तीच आज पंतप्रधानांच्या हृदयात आहे. सर्जिकल हल्ला हे त्याचेच उदाहरण आहे. उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मी झोपू शकलो नाही आणि त्यानंतर काय घडले हे सर्वानांच माहिती आहे.”

केंद्र सरकारने काळ्या पैशाविरोधात उघडलेली मोहिम अतिशय धाडसी पाऊल होते असे ते म्हणाले. विमुद्रीकरणानंतर तीन लाख बनावट कंपन्या बंद केल्या गेल्या असे सांगत काळ्या पैशावर आळा घालता येईल असा विचार आधी कोणीही केला नव्हता असे पंतप्रधानांनी सांगितले.

भारतीयांची मानसिकता आणि भावना बदलली असून त्यातूनच देशात परिवर्तन घडेल असा मला विश्वास वाटतो. देश हा सर्वांपेक्षा मोठा असतो ही भावना जनमानसात निर्माण झाली आहे असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar