Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत तिबेट सीमा पोलीस (आईटीबीपी) च्या गट ‘ए’ सामान्‍य ड्यूटी (कार्यकारी) केडर आणि गैर-सामान्‍य ड्यूटी केडरच्या आढाव्याला मंत्रिमंडळाची मंजुरी


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत तिबेट सीमा पोलीस (आईटीबीपी) च्या गट ‘ए’ सामान्‍य ड्यूटी (कार्यकारी) केडर आणि  गैर-सामान्‍य ड्यूटी केडरच्या आढावा प्रस्तावाला मंजुरी दिली.यासंबंधी पुढील निर्णय घेण्यात आले.

1.  आईटीबीपीच्या वरिष्‍ठ ड्यूटी पदांवर निरीक्षक कर्मचारी वाढवण्यासाठी सहायक कमांडेंट ते अपर महासंचालक पर्यंत विविध पदांवरील  ग्रुप ‘ए’ सामान्‍य ड्यूटी (कार्यकारी) केडर आणि गैर-सामान्‍य ड्यूटी केडरचा आढावा घेण्याचा निर्णय

2.   अपर महासंचालकांच्या नेतृत्व आणि महानिरीक्षकांच्या सहकार्याने दोन नवीन कमांडची स्थापना  (चंडीगढ़ मध्ये पश्चिमी कमांड आणि गुवाहाटीमध्ये पूर्व कमांड )

 

मुख्‍य प्रभाव:

आईटीबीपी मध्ये या  ग्रुप ‘ए’ पदांच्या निर्मितीनंतर निरीक्षण क्षमतेत वाढ होईल.

हा प्रस्‍ताव विविध स्तरांवरील  ग्रुप ‘ए’ कार्यकारी सामान्‍य ड्यूटी केडरमधील  60 पदे आणि ग्रुप ‘ए ‘ गैर सामान्‍य केडरच्या दोन पदांच्या निर्मितीसाठी आहे.

हा प्रस्‍ताव अपर महासंचालकांच्या नेतृत्व आणि महानिरीक्षकांच्या सहकार्यात दोन नवीन कमांडची स्थापना (चंडीगढ़ मध्ये पश्चिमी कमांड आणि गुवाहाटीमध्ये पूर्व कमांड) करण्यासाठी देखील आहे.

 

कार्यान्‍वयन:

औपचारिक अधिसूचना/मान्यता प्राप्‍त झाल्यांनंतर ही नवीन पदे भर्ती नियमांच्या तरतुदीनुसार भरली जातील.

 

प्रमुख वैशिष्ट्ये

क) सामान्‍य ड्यूटी केडर

ग्रुप ‘ए’ पदांची संख्या पुढीलप्रमाणे सध्याच्या 1147 वरून 1207 पर्यंत वाढवणे –

1.  अपर महासंचालकांच्या 2 पदांची वाढ

2.  महानिरीक्षकच्या 10 पदांची वाढ

3.  उप महानिरीक्षक 10 पदांची वाढ

4. कमांडंटच्या 13 पदांची वाढ

5.  21 सी च्या 16 पदांची वाढ

6.  उप कमांडेंटच्या  9 पदांची वाढ

ख) गैर-सामान्‍य ड्यूटी केडर

ग) महासंचालकच्या 2 पदांची वाढ

 

B.Gokhale/S.Kane/P.Kor