भारत आणि तांझानिया दरम्यान जलस्रोत व्यवस्थापन आणि विकासाबाबत झालेल्या कराराला केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजूरी दिली आहे.
या करारानुसार, दोन्ही देशात जलसंवर्धन, जल आणि भूजल व्यवस्थापन आणि जलस्रोतांचे पुनर्भरण यासंदर्भातल्या तंत्रज्ञानाचे आदानप्रदान होईल. या अंतर्गत, दोन्ही देशातील तंत्रज्ञ, प्रशिक्षण संस्था एकमेकांना मार्गदर्शन करतील. या संदर्भात अध्ययन दौरे आणि इतर अभ्यासांसाठी मदत केली जाईल. या सामंजस्य कराराअंतर्गत होणाऱ्या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी एक संयुक्त कृती गटही स्थापन केला जाईल.
R.Aghor/B.Gokhale