Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत-चिली अधिमान्यता व्यापार कराराचा विस्तार


भारत-चिली अधिमान्यता व्यापार कराराचा विस्तार करायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मंजूरी देण्यात आली. भारत-चिलीला विविध बाबी निर्यात करतो आणि चिलीने सादर केलेल्या दरांमधील वैविध्य लक्षात घेऊन, विस्तारीत अधिमान्यता व्यापार करारामुळे भारताला चांगला लाभ होणे अपेक्षित आहे.

भारत आणि चिली यांच्यात 2006 साली एका अधिमान्यता करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. 2007 साली हा करार लागू झाला. 2006-07 या वर्षात भारताच्या निर्यात देशांच्या यादीत चिली हा देश 51व्या क्रमांकावर होता. 2006-07 या वर्षात 2.3 अब्ज अमेरिकी डॉलर इतका द्विपक्षीय व्यापार झाला. सप्टेंबर 2007 मधे करार लागू झाल्यानंतर व्यापाराला वेग आला. 2006-07 पासून 2014-15 पर्यंत द्विपक्षीय व्यापारात 58.49 टक्के वाढ झाली आहे.

M.Pange / S. Tupe / M. Desai