Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

“भारत कोविड-19 आकस्मिक प्रतिसाद आणि आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेसाठी” 15,000 कोटी रुपयांच्या पैकेजला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोविड-19 या जागतिक संसर्गजन्य आजाराच्या संकटातून मात करण्यासाठी भारताच्या आकस्मिक प्रतिसाद आणि आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेसाठी आवश्यक अशा 15,000 कोटी रुपयांच्या पॅकेजला मंजुरी देण्यात आली. या पॅकेजसाठी मंजूर करण्यात आलेला निधी तीन टप्प्यांत वापरला जाणार आहे. कोविड-19 चा सामना करण्यात तातडीच्या उपायांसाठी (7,774 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आणि उरलेला निधी येत्या चार वर्षात मिशन मोडवर आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी  वापरला जाणार आहे. 

या पॅकेजची महत्वाची वैशिष्ट्ये म्हणजेत्यात भारतातकोविड-19 च्या प्रसाराला आळा घालण्यासाठी आकस्मिक प्रतिसादाची व्यवस्था असून त्या अंतर्गतनिदान आणि कोविड समर्पित रुग्णालये व उपचार सुविधासंसर्ग झालेल्या रुग्णांसाठी आवश्यक ती औषधे आणि उपकरणे यांची व्यवस्थाराष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील आरोग्य व्यवस्था अधिक सुदृढ करत भविष्यात या आजाराचा उद्रेक होण्याची शक्यात लक्षात घेतरुग्णालये आणि इतर व्यवस्था सज्ज ठेवणेनिरीक्षण कामांसाठी प्रयोगशाळा आणि इतर व्यवस्था तयार करणेजागतिक संसर्गजन्य आजारविषयक संशोधन आणि समुदायांचा सहभागसंपर्कातून असणाऱ्या धोक्यांविषयी सातत्याने माहिती देणे अशी कामे केली जाणार आहेत. ही सर्व कामे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीत केली जाणार आहेत.

पहिल्या टप्प्यांतआरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानेइतर मंत्रालयांच्या सहकार्यानेअनेक कामे याआधीच सुरु केली आहेत. जसे की: –

 

           i.     सध्या असलेल्या आरोग्य सुविधा अधिक बळकट आणि अद्ययावत करतकोविड-19 च्या आजारावर उपचार करण्यासाठी समर्पित रुग्णालयेकोविड हेल्थ सेन्टर्सकोविड केअर सेंटर्स यांची उभारणी करण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 3,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त फंड देणे. विलगीकरणअलगीकरणचाचण्याउपचारआजाराचे संक्रमण रोखणेसंक्रमित भाग बंद करणेसामाजिक नियमांचे पालन आणि निरीक्षण यासाठीची सविस्तर मार्गदर्शक तत्वेप्रोटोकॉल आणि नियमावली जारी करणे हॉटस्पॉट ओळखून तिथे प्रतिबंधक उपाययोजना राबवणे

         ii.     निदान करण्यासाठीच्या प्रयोगशाळांची क्षमता आणि संख्या वाढवण्यात आली असून दरोज आपली चाचण्यांची क्षमता वाढते आहे. किंबहुनाराष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत संध्या असलेल्या बहु-रोग चाचणी व्यवस्थेचा लाभ घेततिथे कोविड-19 च्या चाचण्या करण्यासाठी 13 लाख चाचणी किट्सची ऑर्डर देण्यात आली आहे.

       iii.     सामुदायिक आरोग्य स्वयंसेवकांसह सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण पैकेज अंतर्गत विमासंरक्षण देण्यात आले आहे. त्याशिवाय, PPE सूटएन-95 मास्कव्हेंटीलेटरचाचण्यांच्या किट्स आणि औषधे यांचा पुरवठा केंद्राकडून सातत्याने होत आहे.

 

या निधीपैकी मोठा हिस्सा आकस्मिक आरोग्य संकटांच्या साज्ज्तेसाठी खर्च केला जाईल. त्याशिवायअशा जागतिक संसर्गजन्य आजारांचा सामना करण्यासाठी संशोधन व बहु-विभागीय राष्ट्रीय संस्थांच्या मदतीने राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील आरोग्य यंत्रणा अधिक बळकट केली जाईल. यात समुदायांचा सहभाग वाढवणेआजाराच्या धोक्याविषयी माहिती आणि त्यापासून बचावासाठी उपाययोजनाक्षमता बांधणीदेखरेख इत्यादी कामे केली जातील.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाला या पैकेजमधील घटकांच्या गरजेनुसार मनुष्यबळाची पुनर्रचना करण्याचे आणि बदलत्या परिस्थितीत व गरजेनुसारअंमलबजावणी करणाऱ्या वैद्यकीय संस्थाच्या कार्यक्षेत्रात बदल करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

 

G.Chippalkatti/R.Aghor/D.Rane