महामहिम, नमस्कार!
सर्वप्रथम, मी माझ्याकडून आणि संपूर्ण भारताच्या वतीने ऑस्ट्रेलियामध्ये कोविड -19 मुळे बाधित सर्व लोक आणि कुटुंबांच्या प्रति मनापासून संवेदना व्यक्त करतो. या जागतिक महामारीने जगभरात सर्व प्रकारची व्यवस्था प्रभावित केली आहे. आणि आपल्या शिखर परिषदेचे हे डिजिटल स्वरुप अशाच प्रकारच्या प्रभावांचे एक उदाहरण आहे.
महामहिम, तुम्हाला या डिजिटल माध्यमातून भेटताना मला आनंद तर झाला आहेच, मात्र मी थोडा निराशही झालो आहे. कारण आम्हाला भारतात तुमचे भव्य स्वागत करण्याची संधी मिळू शकली नाही. आधी जानेवारीत आणि नंतर पुन्हा एकदा गेल्या महिन्यात आम्ही तुमच्या भारत भेटीची प्रतीक्षा करत होतो. मात्र दुर्दैवाने दोन्ही वेळेला दौरा स्थगित करावा लागला. आपली आजची भेट तुमच्या भारत दौऱ्याची जागा घेऊ शकत नाही. एक मित्र या नात्याने माझी तुम्हाला विनंती आहे कि परिस्थिती सुधारल्यानंतर लवकरच तुम्ही सहकुटुंब भारत दौऱ्यावर यायचे ठरवा आणि आमचा पाहुणचार स्वीकारा.
महामहिम, भारत-ऑस्ट्रेलिया संबंध विस्तृत होण्याबरोबरच अधिक दृढ देखील झाले आहेत. आणि आपली सामायिक मूल्ये, सामायिक रुची, सामायिक भूगोल आणि सामायिक उद्दिष्टे यामुळे ते दृढ झाले आहेत. मागील काही वर्षांत आपले सहकार्य आणि ताळमेळ यातही चांगली गती आली आहे. ही सौभाग्यपूर्ण बाब आहे की आपल्या संबंधांच्या नेतृत्वाची एक बाजू तुमच्यासारख्या सशक्त आणि दूरदर्शी नेत्याच्या हातात आहे. मला वाटते कि भारत आणि ऑस्ट्रेलिया संबंध अधिक मजबूत करण्याची हीच योग्य वेळ आहे , हीच योग्य संधी आहे.
आपली मैत्री अधिक मजबूत करण्यासाठी आमच्याकडे अमाप संधी आहेत. या संधी आपल्याबरोबर आव्हाने देखील घेऊन येतात. आव्हान हे आहे कि या संधी प्रत्यक्षात कशा साकारायच्या , जेणेकरून दोन्ही देशांचे नागरिक, व्यवसाय, शिक्षणतज्ञ , संशोधक, इत्यादीमध्ये संबंध कसे मजबूत होतील. आपले संबंध आपल्या प्रांतासाठी आणि जगासाठी एक स्थैर्याचा घटक कसा बनेल, कशा प्रकारे आपल्याला एकत्रितपणे जगाच्या कल्याणासाठी चांगले कार्य करता येईल या सर्व पैलूंवर विचार होण्याची गरज आहे.
महामहिम, समकालीन जगात देशांच्या एकमेकांकडून अपेक्षा आणि आपल्या नागरिकांच्या आपल्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. लोकशाही मूल्ये सामायिक करण्याच्या दृष्टीने आपल्या दोन्ही देशांचे कर्तव्य आहे कि या अपेक्षा पूर्ण करायच्या. म्हणूनच जागतिक कल्याणाची मूल्य जसे लोकशाही , कायद्याचा नियम, स्वातंत्र्य, परस्पर आदर, आंतरराष्ट्रीय संस्थांचा सन्मान, आणि पारदर्शकता कायम राखणे आणि संरक्षण करणे ही आपली पवित्र जबाबदारी आहे. हा एक प्रकारे भविष्यासाठी आपला ठेवा आहे. आज जेव्हा निरनिराळ्या प्रकारे या मूल्याना आव्हान दिले जात आहे तेव्हा आपण परस्पर संबंध मजबूत करून ते सशक्त करू शकतो.
महामहिम, भारत ऑस्ट्रेलियाबरोबरचे आपले संबंध अधिक व्यापक आणि जलद गतीने वृद्धिंगत करण्यासाठी कटिबद्ध आहे. हे केवळ आमच्या दोन्ही देशांच्या दृष्टीकोनातून महत्वाचे नाही तर हिंद-प्रशांत क्षेत्र आणि जगासाठी देखील आवश्यक आहे. मला आनंद आहे कि आपले विविध संस्थागत संवाद आपल्या संबंधांना अधिक चालना देत आहे. दोन्ही देशांच्या दरम्यान नियमित उच्च स्तरीय देवाणघेवाण देखील होत आहे . व्यवसाय आणि गुंतवणूक देखील वाढत आहे. मात्र मी असे म्हणणार नाही कि मी या गतीबद्दल , या विस्ताराबद्दल समाधानी आहे. जेव्हा तुमच्यासारखा नेता आमच्या मित्र देशाचे नेतृत्व करत असताना आपल्या संबंधांमधील विकासाच्या गतीचा निकष देखील महत्त्वाकांक्षी असायला हवा. मला आनंद आहे कि आज आपण आपल्या द्विपक्षीय संबंधात व्यापक धोरणात्मक भागीदारीच्या रूपात उन्नत होत आहोत.
जागतिक महामारीच्या या कालखंडात आपली व्यापक धोरणात्मक भागीदारीची भूमिका अधिक महत्त्वपूर्ण राहील. जगाला या महामारीच्या आर्थिक आणि सामाजिक दुष्परिणामांमधून लवकर बाहेर काढण्यासाठी एक समन्वित आणि सहकार्य दृष्टिकोनाची आवश्यकता आहे.
आमच्या सरकारने या संकटाकडे एक संधी म्हणून पाहण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात जवळजवळ सर्वच क्षेत्रात व्यापक सुधारणेची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. लवकरच प्रत्यक्षात याचे परिणाम पाहायला मिळतील. या कठीण काळात तुम्ही ऑस्ट्रेलियामधील भारतीय समुदाय, आणि खासकरून भारतीय विद्यार्थ्यांकडे ज्याप्रकारे लक्ष पुरवले त्याबद्दल मी तुमचा विशेष आभारी आहे.
B. Gokhale/S.Kane/P.Kor
At the virtual summit with PM @ScottMorrisonMP. https://t.co/6JIpZRae21
— Narendra Modi (@narendramodi) June 4, 2020
सबसे पहले मैं अपनी ओर से और पूरे भारत की ओर से ऑस्ट्रेलिया में COVID-19 से प्रभावित सभी लोगों और परिवारों के प्रति हार्दिक संवेदना प्रकट करना चाहूँगा: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) June 4, 2020
इस वैश्विक महामारी ने विश्व में हर प्रकार की व्यवस्था को प्रभावित किया है। और हमारे summit का यह डिजिटल स्वरूप इसी प्रकार के प्रभावों का एक उदाहरण है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) June 4, 2020
हमारी आज की मुलाक़ात आपकी भारत यात्रा का स्थान नहीं ले सकती। एक मित्र के नाते, मेरा आपसे आग्रह है कि स्थिति सुधरने के बाद आप शीघ्र सपरिवार भारत यात्रा प्लान करें और हमारा आतिथ्य स्वीकार करें: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) June 4, 2020
भारत-ऑस्ट्रेलिया संबंध विस्तृत होने के साथ-साथ गहरे भी हैं। और यह गहराई आती है हमारे shared values, shared interests, shared geography और shared objectives से: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) June 4, 2020
मेरा मानना है कि भारत और ऑस्ट्रेलिया के संबंधों को और सशक्त करने के लिए यह perfect समय है, perfect मौक़ा है। अपनी दोस्ती को और मज़बूत बनाने के लिए हमारे पास असीम संभावनाएँ हैं: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) June 4, 2020
कैसे हमारे संबंध अपने क्षेत्र के लिए और विश्व के लिए एक ‘factor of stability’ बनें, कैसे हम मिल कर global good के लिए कार्य करें, इन सभी पहलुओं पर विचार की आवश्यकता है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) June 4, 2020
भारत ऑस्ट्रेलिया के साथ अपने सम्बन्धों को व्यापक तौर पर और तेज़ गति से बढ़ाने के लिए प्रतिबद्ध है। यह न सिर्फ़ हमारे दोनों देशों के लिए महत्वपूर्ण है, बल्कि Indo-Pacific क्षेत्र और विश्व के लिए भी आवश्यक है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) June 4, 2020
लेकिन मैं यह नहीं कहूँगा कि मैं इस गति से, इस विस्तार से संतुष्ट हूँ। जब आप जैसा लीडर हमारे मित्र देश का नेतृत्व कर रहा हो, तो हमारे संबंधों में विकास की गति का मापदंड भी ambitious होना चाहिए: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) June 4, 2020
वैश्विक महामारी के इस काल में हमारी Comprehensive Strategic Partnership की भूमिका और महत्वपूर्ण रहेगी। विश्व को इस महामारी के आर्थिक और सामाजिक दुष्प्रभावों से जल्दी निकलने के लिए एक coordinated और collaborative approach की आवश्यकता है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) June 4, 2020
हमारी सरकार ने इस Crisis को एक Opportunity की तरह देखने का निर्णय लिया है। भारत में लगभग सभी क्षेत्रों में व्यापक reforms की प्रक्रिया शुरू की जा चुकी है। बहुत जल्द ही ग्राउंड लेवल पर इसके परिणाम देखने को मिलेंगे: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) June 4, 2020
इस कठिन समय में आपने ऑस्ट्रेलिया में भारतीय समुदाय का, और ख़ास तौर पर भारतीय छात्रों का, जिस तरह ध्यान रखा है, उसके लिए मैं विशेष रूप से आभारी हूँ: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) June 4, 2020