Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि श्रीलंका यांच्यात माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातल्या प्रोत्साहनासाठी झालेल्या सामंजस्य कराराबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाला माहिती


भारत आणि श्रीलंका यांच्यात माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी झालेल्या सामंजस्य कराराबाबत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली  केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत माहिती देण्यात आली.केंद्रीय विधी आणि न्याय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांच्या श्रीलंका दौऱ्या दरम्यान 15 जानेवारी 2018 मध्ये या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.

ई गव्हर्नन्स, एम  गव्हर्नन्स, ई सार्वजनिक सेवा प्रदान करणे,सायबर सुरक्षा,सौफ्टवेअर टेक्नोलोजी पार्क,स्टार्ट अप्स इकोसिस्टीम इत्यादी क्षेत्रात अधिक सहकार्याला प्रोत्साहन देण्याचा या सामंजस्य कराराचा उद्देश आहे.

 दोन्ही देशातल्या माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातल्या प्रतिनिधींचा समावेश असलेल्या कार्यकारी गटाची स्थापना करून या सामंजस्य कराराची अंमलबजावणी करण्यात येईल. आयसीटी डोमेन बी 2 बी आणि जी 2 जी मध्ये द्विपक्षीय सहकार्य वृद्धींगत करण्यात येईल.

पूर्वपीठीका

द्विपक्षीय आणि प्रादेशिक सहकार्याअंतर्गत, माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञानाच्या नव-नव्या आणि आघाडीच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देण्याची जबाबदारी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयावर सोपवण्यात आली आहे. माहिती आणि दळणवळण  क्षेत्रात माहितीचे आदान प्रदान  आणि घनिष्ठ सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय विविध देशांच्या संस्था आणि एजसी समवेत सामंजस्य करार आणि करार  करत आहे.डिजिटल इंडिया,मेक इन इंडिया यासारख्या सरकारच्या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे तंत्रज्ञान क्षेत्रात नव्या व्यापार संधी आजमावण्यासाठी विविध देशांशी सहकार्य आणखी वाढवण्याची गरज  निर्माण झाली आहे.

पंतप्रधानांनी 2015  मध्ये श्रीलंकेला दिलेल्या भेटीमुळे भारताच्या शेजारी राष्ट्राशी संबंधाना अग्रक्रम देण्याच्या धोरणाला चालना मिळाली.माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी कोलंबो मधले  भारतीय मिशन आणि परराष्ट्र मंत्रालय यांनी सक्रीय सहकार्यासाठी रूपरेखा निश्चित करण्यावर भर दिला आहे. या संदर्भात इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने, ई गव्हर्नन्स, सायबर सुरक्षा, बी 2 बी भागीदारी, माहिती तंत्रज्ञान शिक्षण आणि संशोधन आणि नाविन्यता इत्यादी आयसीटी क्षेत्रात सहकार्यावर लक्ष केंद्रित करून सर्वंकष सामंजस्य करारासाठी वाटाघाटी केल्या आहेत.

BG/NC