पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने, टपाल विभाग आणि व्हिएतनाम टपाल यांच्या दरम्यानचे टपाल तिकिटाचे संयुक्त मुद्दे समजून घेतले.
टपाल विभाग, दळणवळण मंत्रालय आणि व्हिएतनाम टपाल यांनी परस्पर सहमतीने “प्राचीन वास्तुकला” या विषयावर भारत-व्हिएतनामयांच्यावर टपाल तिकीट जारी करण्यासाठी सहमती दिली. 25-01-2018 रोजी हे संयुक्त टपाल तिकीट जारी करण्यात आले.
या टपाल तिकिटावर भारताचे सांची स्तूप आणि व्हिएतनामच्या फो मिन्ह पॅगोडाचे वर्णन आहे. 18-12-2017 रोजी भारत आणि व्हिएतनामच्या टपाल प्रशासना दरम्यान एक सामंजस्य करार करण्यात आला.
***
N.Sapre/S. Mhatre