Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि लिथुआनिया यांच्यातल्या प्रत्यर्पण करारावर केंद्रीय मंत्रिमंडळाची मोहोर


भारत आणि लिथुआनिया यांच्यात प्रत्यर्पण करारावर स्वाक्षरी करायला आणि मंजुरी द्यायला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

या करारामुळे दहशतवादी,आर्थिक गुन्हेगार आणि इतर गुन्हेगारांना परस्परांकडे हस्तांतरीत करण्यासाठी कायद्याचे अधिष्ठान मिळणार आहे.

भारताविरुद्ध गुन्हे करणाऱ्या दहशतवाद्यांसह, अट्टल गुन्हेगारांना, फौजदारी खटल्यासाठी लिथुआनियातून भारतात आणण्यासाठी हा करार उपयुक्त ठरणार आहे.याद्वारे गुन्हेगारांना न्यायाच्या चौकटीत आणून समाजात शांतता नांदण्यासाठी मदत होणार आहे.

N.Sapre/N.Chitale/Anagha