Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि रशिया दरम्यान संयुक्तपणे टपाल तिकीट जारी करायला मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाला भारतीय टपाल विभाग आणि रशिया पोस्ट यांच्यात संयुक्त टपाल तिकीट जारी करण्याबाबत स्वाक्षरी करण्यात आलेल्या कराराची माहिती देण्यात आली. उभय देशांदरम्यान टपाल तिकीट जारी करण्याच्या क्षेत्रात परस्पर लाभासाठी परिचालन उत्कृष्टता साध्य करणे आणि टपाल सेवेत सहकार्य वृद्धिंगत करणे हा या कराराचा उद्देश आहे.

भारत आणि रशिया दरम्यान द्विपक्षीय संबंध परस्पर हिताच्या मुद्द्यांवर व्यापक सामंजस्याने प्रेरित आहेत. द्विपक्षीय संबंधांच्या बहुतांश सर्वच क्षेत्रात भारत आणि रशियाचे व्यापक सहकार्य आहे.

***

B.Gokhale/S.Kane/D.Rane