Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि मोरोक्को आरोग्य क्षेत्रात सहकार्य करणार


आरोग्य क्षेत्रात सहकार्य करण्याचा करार भारत आणि मोरोक्को यांच्या दरम्यान झाला असून, त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

या उभय देशात पुढील क्षेत्रात सहकार्य करण्यात येणार आहे.

संसर्गजन्य नसलेले रोग, त्यामध्ये बालकांना होणारे ह़दयाचे आजार आणि कर्करोग यांचाही समावेश आहे.

औषध नियामक आणि औषधांचा दर्जा नियंत्रण.

संसर्गजन्य आजार.

मातृत्व, बालके आणि नवजात अर्भकांचे आरोग्य.

रूग्णालयांचा दर्जा सुधारण्यासाठी, चांगल्या गोष्टींची देवाण-घेवाण.

आरोग्य सेवा आणि रुग्णालयांच्या प्रशासन आणि व्यवस्थापनासाठी प्रशिक्षण देणे.

उभय देशांच्या संमतीने आरोग्य विषयक इतर क्षेत्रात सहकार्य करणे.

या सामंजस्य कराराची अंमलबजावणी करण्यासाठी कार्यकारी दल स्थापण्यात येणार आहे.

N.Sapre/S.Bedekar/Anagha