नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुईझ्झू यांनी आज, 7 ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या भेटीत द्विपक्षीय संबंधांच्या संपूर्ण श्रेणीचा व्यापक आढावा घेतला.दोन्ही देशांतील जनतेच्या कल्याणात मोठ्या प्रमाणात योगदान देणाऱ्या या देशांतील ऐतिहासिक घनिष्ठ आणि विशेष संबंध आणखी दृढ करण्याच्या दिशेने झालेल्या प्रगतीची देखील त्यांनी नोंद घेतली.
भारताने ‘शेजारी प्रथम ’ धोरण तसेच सागर या संकल्पनेच्या माध्यमातून मालदीवशी असलेल्या नात्याला दिलेले महत्त्व अधोरेखित करत पंतप्रधान मोदी यांनी मालदीवला त्याचा विकासात्मक प्रवास आणि प्राधान्यक्रमांच्या बाबींमध्ये मदत करण्याप्रती भारताच्या वचनबद्धतेला दुजोरा दिला. तातडीच्या आर्थिक गरजांची पूर्तता करण्यासाठी मे आणि सप्टेंबर 2024 मध्ये 100 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सच्या टी-बिलांची सुविधा आणखी एका वर्षाच्या कालावधीसाठी उपलब्ध करून देऊन मालदीवला अत्यंत गरजेचे असलेले आर्थिक संरक्षण पुरवण्यासह भारताने योग्य वेळी देऊ केलेल्या तातडीच्या वित्तीय पाठबळाबद्दल राष्ट्रपती मोहम्मद मुईझ्झू यांनी भारताचे आभार मानले. गेल्या दशकात 2014 मध्ये माले येथे उद्भवलेल्या जलसंकटात तसेच कोविड-19 जागतिक महामारीच्या आपत्तीच्या वेळी, आणि अशा अनेक संकटांच्या वेळी भारताने मालदीव बाबत ‘मदतीसाठी सर्वप्रथम पोहोचणारा देश’ म्हणून सातत्याने निभावलेल्या भूमिकेचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
मालदीवमध्ये सध्या उद्भवलेल्या आर्थिक आव्हानांना तोंड देण्यात अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या, द्विपक्षीय चलन अदलाबदल (स्वॅप) करारांतर्गत 400 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स आणि 30 अब्ज मूल्याच्या भारतीय रुपयांच्या स्वरुपात पाठबळ पुरवण्याच्या भारत सरकारच्या निर्णयाबद्दल मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुईझ्झू यांनी भारताची प्रशंसा केली. मालदीवसमोर उभ्या ठाकलेल्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी मदत व्हावी म्हणून आणखी काही उपाययोजना राबवण्याला देखील दोन्ही नेत्यांनी मंजुरी दिली.
या देशांमधील द्विपक्षीय संबंध लोककेंद्रित, भविष्याभिमुख तसेच हिंदी महासागर क्षेत्रात स्थैर्य प्रस्थापित करणारा बळकट घटक म्हणून काम करेल अशा सर्वसमावेशक आर्थिक तसेच सागरी सुरक्षाविषयक भागीदारीमध्ये रुपांतरीत करण्याच्या उद्देशासह सहकार्यासाठी एक नवा आराखडा तयार करण्यासाठी दोन्ही देशांच्या बाबतीत ही अत्यंत योग्य वेळ आहे हे दोन्ही नेत्यांनी मान्य केले. या संदर्भात दोन्ही नेत्यांनी खालील निर्णय घेतले:
I. राजकीय पातळीवरील देवाणघेवाण
नेत्यांच्या तसेच मंत्री स्तरावरील देवाणघेवाणीत वाढ करण्यासाठी, दोन्ही देशांकडून खासदार तसेच स्थानिक सरकारचे प्रतिनिधी यांच्या परस्परांच्या देशांना भेटींच्या रुपात विस्तार केला जाईल. त्यासोबतच, द्विपक्षीय संबंधांच्या वाढीत सामायिक लोकशाही मूल्यांचे योगदान मान्य करत दोन्ही देशांतील संसदेदरम्यान संस्थात्मक सहकार्य शक्य होण्यासाठी सामंजस्य करार करण्याचा निर्णय दोन्ही नेत्यांनी घेतला.
II. विकासविषयक सहकार्य
सध्या सुरु असलेल्या आणि मालदीवच्या जनतेसाठी ज्यांनी आधीच भरीव लाभ मिळवून दिले आहेत अशा विकासविषयक भागीदारी प्रकल्पांची प्रगती लक्षात घेत दोन्ही बाजूंकडून खालील निर्णय घेण्यात आले:
III. व्यापार आणि आर्थिक सहकार्य
द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्रातील महत्वपूर्ण आणि आतापर्यंत दृष्टोत्पत्तीस न आलेल्या क्षमतांचा विचार करून, दोन्ही बाजूंनी खालील मुद्द्यावर सहमती दर्शवली:
IV. डिजिटल आणि वित्तीय सहकार्य
डिजिटल आणि वित्तीय क्षेत्रामधील घडामोडींचा प्रशासनावर आणि सेवांच्या वितरणावर परिवर्तनीय प्रभाव पडतो हे लक्षात घेत दोन्ही बाजूंनी खालील बाबींना सहमती दर्शविली:
V. ऊर्जा सहकार्य
शाश्वत विकास सुनिश्चित करण्यात ऊर्जा सुरक्षेची भूमिका लक्षात घेत, दोन्ही बाजूंनी सौर ऊर्जा , इतर नवीकरणीय ऊर्जा आणि ऊर्जा कार्यक्षमता प्रकल्पांच्या अंमलबजावणीद्वारे सहकार्याच्या पैलूंचा शोध घेण्यावर सहमती दर्शविली आणि ऊर्जा खर्च कमी करण्यासाठी आणि मालदीवला त्याचे राष्ट्रीय स्तरावर निर्धारित योगदान अर्थात एनडीसी उद्दिष्टे साध्य करण्यास सक्षम करण्यासाठी दोन्ही बाजूंनी सहमती दर्शविली. दोन्ही देश संस्थात्मक भागीदारीसाठी एक आराखडा तयार करतील ज्यामध्ये प्रशिक्षण, भेटींची देवाणघेवाण, संयुक्त संशोधन, तांत्रिक प्रकल्प आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन यांचा समावेश असेल.
या अनुषंगाने, मालदीवला एक सूर्य एक विश्व एक ग्रिड उपक्रमात सहभागी होण्याच्या दृष्टीने सक्षम करणाऱ्या उपाययोजना ओळखून दोन्ही बाजू एक व्यवहार्यता अभ्यास देखील करतील.
VI. आरोग्य सहकार्य
दोन्ही बाजूंची सहमती:
VII. संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य
भारत आणि मालदीव हिंद महासागर क्षेत्रात समान आव्हानांचा सामना करतात. या आव्हानांचा दोन्ही देशांच्या सुरक्षा आणि विकासावर बहुआयामी परिणाम होतो. नैसर्गिक भागीदार म्हणून, भारत आणि मालदीव या दोन्ही देशांमधील लोकांच्या हितासाठी तसेच विस्तृत हिंद महासागर क्षेत्रासाठी सागरी आणि सुरक्षा सहकार्य वाढवण्यासाठी एकत्र काम करण्याचा संकल्प दोन्ही देशांनी केला आहे.
विशाल विशेष आर्थिक क्षेत्र असलेले मालदीव चाचेगिरी, बेकायदेशीर, नोंद न झालेली आणि अनियमित (IUU) मासेमारी, अंमली पदार्थांची तस्करी आणि दहशतवाद यासह पारंपारिक आणि अपारंपारिक सागरी आव्हानांना तोंड देत आहे. दोन्ही देशांनी सहमती दर्शवली की एक विश्वासार्ह आणि विसंबण्याजोगा भागीदार म्हणून भारत, मालदीवच्या गरजा आणि आवश्यकतांनुसार, कौशल्याची देवाणघेवाण, क्षमता वाढवणे आणि संयुक्त सहकार्य उपाय हाती घेणे यासाठी मालदीवसोबत काम करेल; उथुरु थिला फाल्हू (UTF) येथे भारताच्या सहाय्याने सध्या सुरू असलेला मालदीव राष्ट्रीय संरक्षण दल (MNDF) चा ‘एकता’ बंदर प्रकल्प पूर्ण करण्यात आणि मालदीव राष्ट्रीय संरक्षण दलाची कार्यक्षमता वाढविण्यात भारत महत्त्वपूर्ण योगदान देईल आणि हे प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्यावर दोन्ही देशांनी संमती दर्शवली.
दोन्ही देशांनी पुढील बाबींवर देखील सहमती दर्शविली:
VIII. क्षमता वृद्धी आणि प्रशिक्षण
मालदीवच्या मनुष्यबळ विकास गरजांमध्ये सकारात्मक योगदान दिलेल्या विविध विद्यमान क्षमता वृद्धी उपक्रमांचा आढावा घेऊन दोन्ही देशांनी प्रशिक्षण आणि क्षमता वृद्धीसाठी मालदीवच्या गरजा आणि प्राधान्यक्रमनुसार सहाय्य वाढवण्यावर सहमती दर्शवली.
पुढील गोष्टींनाही त्यांनी मान्यता दिली:
IX जनतेमधील सुसंवाद
भारत आणि मालदीव या दोन देशांमधील खास आणि एकमेवाद्वितीय अशा बंधांचा जो भक्कम आधार आहे तो म्हणजे जनतेचा परस्परांशी असलेला सुसंवाद दृढ करण्याबाबत आणि त्यासाठी पुढील उपाययोजना करण्याबाबत दोन्ही बाजूने सहमती दर्शवण्यात आली:
X. प्रादेशिक आणि बहुपक्षीय मंचावर सहकार्य
भारत आणि मालदीव यांच्यातील घनिष्ठ सहकार्यांमुळे दोन्ही देशांना प्रादेशिक तसाच आंतरराष्ट्रीय स्तरावर लाभ झाला आहे आणि समान हितसंबंधांच्या मुद्द्यांवर त्यांनी आवाज उठवला आहे. कोलंबो सुरक्षा परिषदेत चार्टरवर नुकत्याच झालेल्या स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आणि सी एस सी चे संस्थापक सदस्य म्हणून भारत आणि मालदीव यांनी सुरक्षित संरक्षित आणि शांततापूर्ण हिंद महासागर क्षेत्र प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने त्यांचे सामायिक सागरी आणि सुरक्षा हितसंबंधांमध्ये वृद्धी करण्यासाठी एकत्रित काम करण्याचा पुनरुच्चार केला.
या दोन्ही देशांनी बहुपक्षीय मंचावर एकत्रित काम सुरू ठेवण्यावर सहमती दर्शवली.
उभय नेत्यांनी भारत आणि मालदीव या दोन्ही देशांमधील अधिकाऱ्यांना, भारत आणि मालदीव या दोन्ही देशांच्या जनतेच्या समान लाभाच्या दृष्टीने या दोन्ही देशांमधील सर्वसमावेशक आर्थिक आणि सागरी सुरक्षेच्या भागीदारीला चालना देण्याच्या उद्देशाने आखलेल्या सहकार्याच्या क्षेत्रांची शीघ्र आणि कार्यक्षम अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले . या दृष्टिकोनसंबंधीत दस्तावेजांच्या अंमलबजावणीतील प्रगतीवर देखरेख ठेवण्यासाठी उच्चस्तरीय केंद्रीय गट स्थापन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. या गटाचे नेतृत्व हे दोन्ही बाजूंच्या सहमतीने ठरवले जाईल.
* * *
S.Kane/Sanjana/Bhakti/Shraddha/Vijaya/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
Addressing the press meet with President @MMuizzu of Maldives.https://t.co/1wB3CZgfnI
— Narendra Modi (@narendramodi) October 7, 2024
भारत और मालदीव के संबंध सदियों पुराने हैं।
— PMO India (@PMOIndia) October 7, 2024
और भारत, मालदीव का सबसे करीबी पड़ोसी और घनिष्ठ मित्र देश है।
हमारी “Neighbourhood First” policy और “सागर” Vision में भी मालदीव का महत्वपूर्ण स्थान है: PM @narendramodi
भारत ने सदैव मालदीव के लिए First Responder की भूमिका निभाई है।
— PMO India (@PMOIndia) October 7, 2024
चाहे मालदीव के लोगों के लिए essential commodities की जरूरत पूरा करना हो, प्राकृतिक आपदा के समय पीने का पानी उपलब्द्ध कराना हो, कोविड के समय वैक्सीन देने की बात हो, भारत ने हमेशा अपने पड़ोसी होने के दायित्व को निभाया…
आज, हमने पुनर्विकसित हनीमाधु एयरपोर्ट का उद्दघाटन किया है।
— PMO India (@PMOIndia) October 7, 2024
अब, Greater ‘माले’ Connectivity Project में भी तेजी लाई जाएगी।
थिलाफुशी में नए commercial पोर्ट के विकास में भी सहयोग दिया जायेगा।
आज, भारत के सहयोग से बनाये गए 700 से अधिक सोशल हाउसिंग यूनिट्स hand over किये गए हैं:…
मालदीव में RuPay कार्ड लॉन्च किया गया है।
— PMO India (@PMOIndia) October 7, 2024
आने वाले समय में, भारत और मालदीव को UPI से भी जोड़ने के लिए काम किया जायेगा: PM @narendramodi