Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि मालदीव दरम्यान व्हिसा व्यवस्थेच्या सुविधेशी संबंधित कराराला मंत्रिमंडळाची कार्योत्तर मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि मालदीव दरम्यान डिसेंबर 2018 मध्ये स्वाक्षरी करण्यात आलेल्या व्हिसा व्यवस्थेच्या सुविधेवरील कराराला कार्योत्तर मंजुरी दिली आहे.

व्हिसा सुविधेशी संबंधित करारावर मालदीवच्या राष्ट्रपतींच्या भारत दौऱ्यादरम्यान स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. उभय देशांच्या जनतेमधील परस्पर संबंध मजबूत करणे हा या कराराचा उद्देश आहे. यामुळे दोन्ही देशांच्या नागरिकांना पर्यटन, वैद्यकीय उपचार, शिक्षण, उद्योग आणि रोजगारासाठी एकमेकांच्या देशात प्रवास करणे सुलभ होईल. पर्यटन, वैद्यकीय उपचार आणि मर्यादित उद्योगाच्या उद्देशासाठी 90 दिवसांच्या व्हिसा मुक्त प्रवासाची या करारात तरतूद आहे. तसेच अशा प्रकारच्या व्हिसा मुक्त प्रवेशाला वैद्यकीय व्हिसा, विद्यार्थ्यांच्या आश्रितांसाठी आणि एकमेकांच्या प्रदेशात रोजगार मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या व्हिसात सहजपणे रुपांतरित करण्याची तरतूदही या करारात आहे.

***

B.Gokhale/S.Kane/P.Kor