Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि मालदीव दरम्यान आरोग्य क्षेत्रातील सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि मालदीव दरम्यान आरोग्य क्षेत्रातील सामंजस्य कराराला कार्योत्तर मंजुरी दिली आहे. या करारावर 8 जून 2019 रोजी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.

 

या करारात पुढील क्षेत्रातील सहकार्याचा समावेश आहे-

1.      डॉक्टर्स अधिकारी आणि अन्य आरोग्य व्यावसायिक आणि तज्ज्ञांचे प्रशिक्षण आणि आदान-प्रदान

2.     वैद्यकीय आणि आरोग्य संशोधन विकास

3.     औषधे आणि वैद्यकीय उत्पादनांचे नियमन आणि त्यावरील माहितीचे आदानप्रदान

4.     संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजार ई-आरोग्य आणि टेलिमेडिसिन

5.     परस्पर मंजुरीच्या अन्य क्षेत्रात सहकार्य

या सामंजस्य कराराच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी आणि सहकार्याची सविस्तर माहिती देण्यासाठी एक कृतिगट स्थापन केला जाईल.

 

B.Gokhale/S.Kane/D.Rane