Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि भूतान दरम्यान व्यापार, वाणिज्य आणि प्रवासविषयक नव्या कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज भारत आणि भूतान दरम्यान व्यापार, वाणिज्य आणि प्रवासविषयक नव्या कराराला मंजुरी दिली.

या करारानुसार भारत आणि भूतान सरकारांदरम्यान द्विपक्षीय व्यापारी संबंध प्रशासित असतात. या करारांमुळे दोन्ही देशांना मुक्त व्यापाराची संधी प्राप्त होते.

29 जुलै 2006 रोजी दहा वर्षांच्या अवधीसाठी या कराराचे नुतनीकरण करण्यात आले होते. त्यानंतर 29 जुलै 2016 पासून एका वर्षाच्या कालावधीसाठी किंवा नवा करार अस्तित्वात येईपर्यंत कराराच्या वैधतेला मुदतवाढ देण्यात आली होती.

B.Gokhale/M.Pange/P.Kor