पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाला भारत आणि बेल्जियम यांच्यातील माहिती दळणवळण तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात सहकार्याबाबत सामंजस्य कराराची माहिती देण्यात आली. बेल्जीयमचे राजे फिलिप यांच्या भारत दौऱ्यात 7,नोव्हेंबर 2017.रोजी या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.
माहिती दळणवळण तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील सर्वोत्तम पद्धतीचे आदान प्रदान , डिजिटल अजेंडा तंत्रज्ञान आणि संशोधन, ई-शासन आणि ई-सार्वजनिक सेवा , परिषदांमध्ये सहभाग, अभ्यास दौरे, सायबर सुरक्षा आदी मुद्द्यांबाबत उभय देशांदरम्यान सहकार्य वृद्धिंगत करणे हा या कराराचा उद्देश आहे.
N.Sapre/S.Kane/Anagha