Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि बिल आणि मेलिंडा गेट्‌स फाउंडेशन मधील आरोग्य क्षेत्रातील सहकार्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची पूर्वलक्ष्यी प्रभावाने मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग, भारत सरकार आणि बिल व मेलिंडा गेट्‌स फाउंडेशन या दरम्यानच्या आरोग्य क्षेत्रातील सहकार्य कराराला पूर्वलक्ष्यी प्रभावाने मान्यता देण्यात आली. नोव्हेंबर 2019 मध्ये या फाउंडेशनचे सहअध्यक्ष आणि विश्वस्त बिल गेट्‌स यांच्या दिल्ली भेटीत या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या.

हा सहकार्य करार खालील क्षेत्रांमध्ये लागू होईल:-

1. माता मृत्यू दर, नवजात शिशु मृत्यू दर कमी करणे, प्रमुख पोषणात्मक उद्दीष्टे गाठणे यासाठी आवश्यक प्राथमिक आरोग्य सेवा, लसीकरण, पोषण सुविधा यांची व्याप्ती आणि दर्जा सुधारणे.

2. कुटुंबनियोजन पद्धतींचे पर्याय वाढवणे तसेच त्यांचा दर्जा सुधारणे आणि तरुण महिलांसाठी, बदलता येण्याजोगे पर्याय उपलब्ध करुन देणे.

3. क्षय रोग, काळा आजार(व्हीएल), हत्तीपाय(एलएफ) यासारख्या संसर्गजन्य रोगांचे प्रमाण कमी करणे.

4. आरोग्य सेवांना बळकटी देण्यासाठी निधीचा वापर, मनुष्यबळाचे व्यवस्थापन तसेच डिजिटल सेवा पुरवठा साखळ्या आणि देखरेख पद्धती आदींमध्ये सुधारणा करणे.

वरील कराराची अंमलबजावणी तसेच प्रगती यावर लक्ष ठेवण्यासाठी ‘कार्यक्रम कृती समिती’ स्थापली जाईल.

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar