भारताच्या नौवहन मंत्रालयांतर्गत येणारे दीपगृह महासंचालनालय आणि बांग्लादेशचे नौवहन खाते यांच्यात जलवाहतूक सहकार्याबाबत(AtoNs) झालेल्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
द्वीपगृह आणि द्वीपस्तंभ याबाबत सल्ला, जहाज वाहतूक सेवा तसेच ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम अर्थात ओळख यंत्रणेची श्रुंखला याबाबत या सामंजस्य करारांतर्गत सल्ला देण्यात येणार आहे. जलवाहतूक आणि द्वीपगृहाबाबत आंतरराष्ट्रीय संघटनेला अनुसरून बांग्लादेशातल्या संबंधित व्यवस्थापकांना आणि तंत्रज्ञाना प्रशिक्षणही देण्यात येईल.
या सामंजस्य करारामुळे, दक्षिण आशिया भागात, ए टू एन क्षेत्रात क्षमता वृध्दीमध्ये अधिक सहकार्यासाठी मदत होणार आहे. भारत आणि बांग्लादेश हे दक्षिण आशिया मधले महत्वाचे विकसनशील देश असून उभय देशात मैत्रीपूर्ण आणि सौहार्दपूर्ण संबंधाची दीर्घ परंपरा आहे.
N.Sapre/N.Chitale/Anagha