भारत आणि बांगलादेश यांच्यात गुंतवणूक प्रोत्साहन आणि संरक्षण करार विषयक जॉईंट इंटरप्रेटेटिव्ह नोट्स (जे आय एन)ला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात गुंतवणूक प्रोत्साहन आणि संरक्षण विषयक अस्तित्वात असलेल्या कराराच्या अर्थाबाबत, व्याख्येविषयी या जे.आय.एन.मुळे सुस्पष्टता येणार आहे.
गुंतवणूकदाराची व्याख्या, गुंतवणुकीची व्याख्या, सर्वात पसंतीचा देश, गुंतवणूकदार आणि दुसरा पक्ष यांच्यातल्या विवादाचा निपटारा यासारख्या अनेक मुद्यांबाबत स्पष्टीकरणात्मक टाचणांचा या जे.आय.एन.मध्ये समावेश राहणार आहे.
N. Sapre/N.Chitale/Darshana