Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील सामाजिक सुरक्षा करारात दुरुस्ती करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील सामाजिक सुरक्षा करारात ” निवासी देश” ही दुरुस्ती समाविष्ट करायला मंजुरी दिली आहे.

अधिसूचित तारखेच्या तिसऱ्या महिन्यापासून हा सुधारित करार लागू झाल्यावर दोन्ही देशांमधील संबंध दृढ होण्यास मदत होईल आणि परदेशात व्यापार करण्याचा खर्च कमी होऊन नफ्यात वाढ होईल. तसेच उभय देशांदरम्यान गुंतवणुकीचा ओघ वाढण्यास या सुधारित करारामुळे मदत होईल.

जून २०१० पासून सामाजिक सुरक्षा करार यशस्वीपणे कार्यन्वित असून नेदरलँन्डसमध्ये काम करणाऱ्या भारतीयाना याचा लाभ झाला आहे.

B.Gokhale/S.Kane/Anagha