Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि तैवान यांच्यातील हवाई सेवा कराराला मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने तैपेई येथील भारत-तैपेई संघटना (तैवान मधील भारताचे प्रातिनिधिक कार्यालय) आणि भारतातील तैपेई आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र (तैवानचे भारतातील प्रातिनिधिक कार्यालय) यांच्यातील हवाई सेवा करारावर स्वाक्षरी करायला मंजुरी दिली.

सध्या भारत व तैवान यांच्यात कोणताही अधिकृत हवाई सेवा करार नाही आणि एअर इंडिया चार्टर्स लिमिटेड (एआयआरएल) आणि तैपेई एअरलाईन्स असोसिएशन्स (टीएए) यांच्यातील सामंजस्य करारानुसार हवाई सेवा सुरु आहे.

भारत आणि तैवान यांच्यातील नागरी उड्डाण संबंधांमध्ये हा हवाई सेवा करार महत्त्वाचा टप्पा आहे. आणि उभय पक्षांमध्ये व्यापार, गुंतवणूक, पर्यटन आणि सांस्कृतिक देवाणघेवाण वाढण्याची यामध्ये क्षमता आहे.

S. Kane / B. Gokhale