नवी दिल्ली , 18 जानेवारी 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाला आज, भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालया अंतर्गत असलेल्या केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था (सीडीएससीओ) आणि डॉमिनिकन प्रजासत्ताकचे सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक सहाय्यक मंत्रालयाचे औषध, अन्न आणि स्वच्छताविषयक उत्पादने संघटना महासंचालनालय यांच्यात वैद्यकीय उत्पादने नियमन क्षेत्रातील सहकार्याबाबत झालेल्या सामंजस्य कराराविषयी माहिती देण्यात आली. या सामंजस्य करारावर 4 ऑक्टोबर 2023 रोजी स्वाक्षरी करण्यात आली आहे .
हा सामंजस्य करार वैद्यकीय उत्पादनांशी संबंधित क्षेत्रांमध्ये माहिती आणि सहकार्याची देवाणघेवाण आणि उभय देशांच्या अधिकारक्षेत्रातील संबंधित प्रशासकीय आणि नियामक बाबींना प्रोत्साहन देईल.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या निकृष्ट दर्जाच्या, बनावट औषधांच्या समस्येवर मात करण्यासाठी नियामक संस्थांमधील परस्परसंवादाची सुविधा या सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्याने उपलब्ध झाली आहे.
नियामक पद्धतींमधील एकत्रीकरण भारतातून औषधांची निर्यात वाढवण्यात मदत करू शकते आणि परिणामी औषध निर्मिती क्षेत्रातील शिक्षित व्यावसायिकांसाठी रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
या सामंजस्य करारामुळे वैद्यकीय उत्पादनांची निर्यात सुलभ होईल ज्यामुळे परकीय चलन मिळू शकेल. हे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक पाऊल असेल.
S.Tupe/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai