Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि जॉर्जिया यांच्यात हवाई सेवा कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


भारत आणि जॉर्जिया यांच्यात नव्या आंतरराष्ट्रीय नागरी हवाई सेवा संघटनेच्या मानकांनुसार कराराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. सध्या या दोन्ही देशांदरम्यान कोणतीही हवाई सेवा सुरू नाही. हवाई वाहतूक क्षेत्रातील नव्या घडामोडींना विचारात घेऊन दोन्ही देशांदरम्यान हवाई संपर्क सुधारण्यासाठी हा करार करण्यात आला आहे.

N.Sapre/S.Patil/Anagha