जर्मनीमधल्या “स्टेएनबेस गॅम्ब कंपनी केजी फॉर टेक्नॉलॉजी ट्रान्सफर” या कंपनीबरोबरच्या सामंजस्य कराराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. जर्मनीतल्या हॅनोवर येथे 25 एप्रिल 2016 मध्ये झालेल्या औद्योगिक प्रदर्शन हॅनोवर मेस्सी 2016 मध्ये हा सामंजस्य करार झाला होता.
उपयोजित औद्योगिक संशोधनात स्टेएनबेस गॅम्भ ही अव्वल कंपनी आहे. निर्मिती क्षेत्रात ठराविक प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी तंत्रज्ञानविषयक स्रोत भागीदार म्हणून ही कंपनी सहाय्य करणार आहे. करारानुसार पुढील क्षेत्रात सहकार्य केले जाईल.
विशिष्ट तंत्रज्ञानाची रुपरेषा
विशिष्ट भांडवली वस्तू उपक्षेत्रासाठी तंत्रज्ञानाचा आराखडा
भांडवली वस्तू समूहातील तंत्रज्ञानाच्या स्थितीचा आढावा
तंत्रज्ञानविषयक कार्यक्रमांमध्ये सहकार्य
सध्याच्या तंत्रज्ञान संस्था अद्ययावत करणे/तंत्रज्ञानविषयक सहकार्य
या करारामुळे ते स्टेएनबेस गॅम्ब कंपनीच्या कौशल्याचा सार्वजनिक क्षेत्र उपक्रमांना तंत्रज्ञानविषयक त्रुटी दूर करण्यासाठी फायदा होणार आहे.
S.Kulkarni/B.Gokhale