Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि कोरिया यांच्यात खलाशांसाठी परस्परांच्या प्रमाणपत्रांना मान्यता देणारा करार करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारत आणि कोरिया दरम्यान परस्परांच्या प्रमाणपत्रांना मान्यता देणाऱ्या हमीपत्रावर स्वाक्षरी करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. खलाशांसाठी परस्परांच्या प्रमाणपत्रांना मान्यता देणारा हा करार आहे.

या हमीपत्रामुळे दुसऱ्या देशाच्या सरकारने खलाशांना दिलेल्या सागरी शिक्षण, प्रशिक्षण, स्पर्धात्मकता प्रमाणपत्र, वैद्यकीय प्रमाणपत्र यांना मान्यता मिळण्याच्या दृष्टीने मार्ग मोकळा होईल.

N.Sapre/S. Kakade/P. Kor