Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि कॅनडा संयुक्तपणे टपाल तिकिटे जारी करण्याबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाला अवगत करण्यात आले


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाला आज माहिती देण्यात आली कि भारत आणि कॅनडा यांनी संयुक्तपणे “दिवाळी” या संकल्पनेवर आधारित दोन स्मृती टपाल तिकिटे जारी करण्याबाबत सहमती दर्शवली आहे.

21सप्टेंबर 2017 रोजी या टपाल तिकिटांचे प्रकाशन होईल. यासाठी भारतीय टपाल विभाग आणि कॅनडा टपाल विभाग यांनी यापूर्वीच एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

भारत आणि कॅनडा यांच्या दरम्यान लोकशाही, बहुतावाद, सर्वांसाठी समानता आणि कायदे नियमांवर आधारित प्रदीर्घ संबंध आहेत. उभय देशांमधील जनत्तेतील थेट संपर्क तसेच कॅनडातील मोठा भारतीय समुदाय यामुळे या संबंधांना मजबूत आधार लाभला आहे.

उभय देशांसाठी सांस्कृतिक संकल्पना असल्यामुळे आणि कॅनडातील मोठा भारतीय समुदाय लक्षात घेऊन या संयुक्त टपाल तिकिटासाठी “दिवाळी” ही संकल्पना निवडण्यात आली आहे.

पी.आई.बी/बी.गोखले/एस.काणे