Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि कुवेत यांच्यात घर कामगारांच्या भर्तीबाबतच्या सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मान्यता


भारत आणि कुवेत यांच्यात घर कामगारांच्या भर्तीबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

तपशील:

या सामंजस्य करारा द्वारे,घर कामगारांसंदर्भात सहकार्यविषयक सुनियोजित आराखडा मिळणार असून कुवेत मधे काम करणाऱ्या भारतीय महिला कामगारांसह घर कामगारांना मजबूत सुरक्षितता प्राप्त होणार आहे.हा करार पाच वर्षासाठी असून त्यानंतर त्याचे आपोआप नुतनीकरण होण्याची तरतूद यात आहे.

अंमलबजावणी धोरण :

या सामंजस्य कराराच्या अंमलबजावणीसाठी संयुक्त समिती स्थापन करण्यात येणार आहे.

परिणाम :

घर कामगार विषयक बाबीत,दोनही देशातल्या द्विपक्षीय सहकार्याला या करारामुळे प्रोत्साहन मिळणार आहे.

लाभार्थी :

कुवेतमधे सुमारे 3,00,000 भारतीय घर कामगार काम करत असून यात 90, 000 महिलांचा समावेश आहे.

S.Tupe/N.Chitale/D. Rane