नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी 2025
महामहिम अध्यक्ष ट्रम्प,
दोन्ही देशांचे प्रतिनिधी,
माध्यमांमधील मित्रांनो,
नमस्कार!
सर्वप्रथम, मी माझे प्रिय मित्र अध्यक्ष ट्रम्प यांचे माझे शानदार स्वागत आणि आदरातिथ्याबद्दल मनापासून आभार मानतो. अध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांच्या नेतृत्वाद्वारे, भारत-अमेरिका संबंध जपले आहेत आणि पुनरुज्जीवित केले आहेत.
त्यांच्या पहिल्या कार्यकाळात ज्या उत्साहाने आम्ही एकत्र काम केले होते; तोच उत्साह, तीच ऊर्जा आणि तीच वचनबद्धता मला आज जाणवली.
आजच्या आमच्या चर्चेत त्यांच्या पहिल्या कार्यकाळातील आमच्या कामगिरीबाबत समाधान आणि परस्परांप्रती विश्वासाचा सेतू होता. तसेच नवीन उद्दिष्टे साध्य करण्याचा संकल्प देखील होता. भारत आणि अमेरिकेची साथ आणि सहकार्य एक उत्तम जग घडवू शकते असा आम्हाला विश्वास वाटतो.
मित्रहो,
अमेरिकेतील लोक अध्यक्ष ट्रम्प यांच्या “मेक अमेरिका ग्रेट अगेन” म्हणजेच “मागा” या ब्रीदवाक्याशी परिचित आहेत. भारतातील लोक देखील वारसा आणि विकासाच्या मार्गावर “विकसित भारत 2047″चा संकल्प घेऊन जलद गतीने विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहेत.
मी जर अमेरिकेच्या भाषेत म्हटले तर विकसित भारत म्हणजे ‘मेक इंडिया ग्रेट अगेन ‘ म्हणजेच “मिगा “. जेव्हा अमेरिका आणि भारत एकत्र काम करतात, म्हणजेच “मागा ” आणि “मिगा ” एकत्र येतात , तेव्हा समृद्धीसाठी “मेगा (MEGA) ” भागीदारी तयार होते. आणि हीच मेगा ( प्रचंड) भावना आपल्या उद्दिष्टांना नवीन व्याप्ती आणि वाव देते.
मित्रहो,
आज, आम्ही द्विपक्षीय व्यापार 2030 पर्यंत दुपटीने अधिक वाढवून 500 अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवले आहे. आमच्या टीम्स परस्पर हितावह व्यापार करार लवकर पूर्ण करण्याच्या दिशेने काम करतील.
भारताची ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आम्ही तेल आणि वायू व्यापार अधिक मजबूत करू. ऊर्जा विषयक पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक देखील वाढेल.
अणुऊर्जा क्षेत्रात, आम्ही छोट्या मॉड्यूलर रिऍक्टर्सच्या दिशेने सहकार्य वाढवण्याबद्दल देखील चर्चा केली.
मित्रहो,
भारताच्या संरक्षण सज्जतेत अमेरिकेची महत्त्वाची भूमिका आहे. धोरणात्मक आणि विश्वासार्ह भागीदार म्हणून, आम्ही संयुक्त विकास, संयुक्त उत्पादन आणि तंत्रज्ञानाचे हस्तांतरण या दिशेने सक्रियपणे पुढे जात आहोत.
आगामी काळात, नवीन तंत्रज्ञान आणि उपकरणे आमची क्षमता वाढवतील. आम्ही ऑटोनॉमस सिस्टम्स इंडस्ट्री अलायन्स सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
आगामी दशकासाठी संरक्षण सहकार्य आराखडा तयार केला जाईल. संरक्षण आंतर-परिचालन क्षमता, लॉजिस्टिक्स, दुरुस्ती आणि देखभाल हे देखील त्याचे मुख्य घटक असतील.
मित्रहो,
एकविसावे शतक हे तंत्रज्ञानाधारित शतक आहे. लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवणाऱ्या देशांमधील तंत्रज्ञान क्षेत्रातील घनिष्ट सहकार्य संपूर्ण मानवजातीला नवीन दिशा, बळकटी आणि संधी देऊ शकते.
भारत आणि अमेरिका कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर, क्वांटम, जैवतंत्रज्ञान आणि अन्य तंत्रज्ञान क्षेत्रात एकत्र काम करतील.
आज आपण ट्रस्ट (टीआरयूएसटी) वर, म्हणजेच धोरणात्मक तंत्रज्ञानाचा अवलंब करून संबंधांमध्ये परिवर्तन घडवण्यावर सहमती दर्शवली आहे. या अंतर्गत, महत्वाची खनिजे, प्रगत सामग्री आणि औषधांच्या मजबूत पुरवठा साखळ्या तयार करण्यावर भर दिला जाईल. लिथियम आणि पृथ्वीवरील दुर्मिळ सामरिक खनिजांची पुनर्प्राप्ती आणि प्रक्रिया उपक्रम सुरू करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.
अंतराळ क्षेत्रात आमचे अमेरिकेसोबत गाढे सहकार्य आहे. “इस्रो” आणि “नासा” यांच्या सहकार्याने तयार केलेला “निसार” उपग्रह लवकरच भारतीय प्रक्षेपण वाहनाद्वारे अंतराळात प्रक्षेपित केला जाईल.
मित्रहो,
भारत आणि अमेरिकेतील भागीदारी लोकशाही आणि लोकशाही मूल्ये आणि व्यवस्थांना आधार देते. हिंद-प्रशांत क्षेत्रात शांतता, स्थैर्य आणि समृद्धी वृद्धिंगत करण्यासाठी आम्ही एकत्र काम करू. यामध्ये क्वाड महत्वाची भूमिका बजावेल.
या वर्षी भारतात होणाऱ्या क्वाड शिखर परिषदेत, आम्ही नवीन क्षेत्रांमध्ये भागीदार देशांसोबत सहकार्य वाढवू. “आयएमईसी” आणि “आय2यु2” उपक्रमांतर्गत, आम्ही आर्थिक कॉरिडॉर आणि कनेक्टिव्हिटी पायाभूत सुविधांवर सोबत काम करू.
दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात भारत आणि अमेरिकेची परस्परांना खंबीर साथ आहे. सीमापार दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी एकत्रित कृती आवश्यक आहे यावर आम्ही सहमत आहोत.
2008 मध्ये भारतात नरसंहार करण्याऱ्या अपराध्याला आता भारताकडे सोपवण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी राष्ट्राध्यक्षांचे आभार मानतो. भारतीय न्यायालये आता योग्य ती कारवाई करतील.
मित्रहो,
अमेरिकेतील भारतीय समुदाय हा उभय देशांच्या संबंधातील एक महत्त्वाचा दुवा आहे. नागरिकांमधील परस्पर संबंध अधिक दृढ करण्यासाठी, आम्ही लवकरच लॉस एंजेलिस आणि बोस्टनमध्ये नवीन भारतीय वाणिज्य दूतावास उघडणार आहोत.
आम्ही अमेरिकन विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांना भारतात त्यांचे ऑफ शोअर कॅम्पस उघडण्यासाठी आमंत्रित केले आहे.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प,
तुमच्या मैत्री आणि भारताप्रती असलेल्या अतूट बांधिलकीबद्दल मी तुमचे आभार मानतो. तुमची 2020 मधील भारत भेट अजूनही भारतीय जनतेच्या स्मरणात आहे आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प पुन्हा एकदा त्यांना भेटतील अशी त्यांना आशा आहे.
1.4 अब्ज भारतीयांच्या वतीने, मी तुम्हाला भारतात येण्याचे आमंत्रण देतो.
खूप खूप धन्यवाद.
S.Kakade/S.Kane/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
Addressing the press meet with @POTUS @realDonaldTrump. https://t.co/u9a3p0nTKf
— Narendra Modi (@narendramodi) February 13, 2025
सबसे पहले मैं, मेरे प्रिय मित्र राष्ट्रपति ट्रम्प को मेरे शानदार स्वागत और आतिथ्य सत्कार के लिए हार्दिक आभार व्यक्त करता हूँ।
— PMO India (@PMOIndia) February 13, 2025
राष्ट्रपति ट्रम्प ने भारत और अमेरिका संबंधों को अपने नेतृत्व से संजोया है, जीवंत बनाया है: PM @narendramodi
हम मानते हैं कि भारत और अमेरिका का साथ और सहयोग एक बेहतर विश्व को shape कर सकता है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) February 13, 2025
अमेरिका की भाषा में कहूं तो विकसित भारत का मतलब Make India Great Again, यानि “मीगा” है।
— PMO India (@PMOIndia) February 13, 2025
जब अमेरिका और भारत साथ मिलकर काम करते हैं, यानि “मागा” प्लस “मीगा”, तब बन जाता है –“मेगा” पार्ट्नर्शिप for prosperity.
और यही मेगा spirit हमारे लक्ष्यों को नया स्केल और scope देती है: PM
अमेरिका के लोग राष्ट्रपति ट्रम्प के मोटो, Make America Great Again, यानि “मागा” से परिचित हैं।
— PMO India (@PMOIndia) February 13, 2025
भारत के लोग भी विरासत और विकास की पटरी पर विकसित भारत 2047 के दृढ़ संकल्प को लेकर तेज गति शक्ति से विकास की ओर अग्रसर हैं: PM @narendramodi
भारत की defence preparedness में अमेरिका की महत्वपूर्ण भूमिका है।
— PMO India (@PMOIndia) February 13, 2025
Strategic और trusted partners के नाते हम joint development, joint production और Transfer of Technology की दिशा में सक्रिय रूप से आगे बढ़ रहे हैं: PM @narendramodi
आज हमने TRUST, यानि Transforming Relationship Utilizing Strategic Technology पर सहमती बनायीं है।
— PMO India (@PMOIndia) February 13, 2025
इसके अंतर्गत critical मिनरल, एडवांस्ड material और फार्मास्यूटिकल की मजबूत सप्लाई chains बनाने पर बल दिया जायेगा: PM @narendramodi
भारत और अमेरिका की साझेदारी लोकतंत्र और लोकतान्त्रिक मूल्यों तथा व्यवस्थाओं को सशक्त बनाती है।
— PMO India (@PMOIndia) February 13, 2025
Indo-Pacific में शांति, स्थिरता और समृद्धि को बढ़ाने के लिए हम मिलकर काम करेंगे।
इसमें Quad की विशेष भूमिका होगी: PM @narendramodi
आतंकवाद के खिलाफ लड़ाई में भारत और अमेरिका दृढ़ता से साथ खड़े रहे हैं।
— PMO India (@PMOIndia) February 13, 2025
हम सहमत हैं कि सीमापार आतंकवाद के उन्मूलन के लिए ठोस कार्रवाई आवश्यक है: PM @narendramodi