Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारतीय हवाई दलाचे मार्शल अर्जन सिंग यांच्या प्रकृतीची पंतप्रधानांनी रुग्णालयात जाऊन केली विचारपूस, मार्शल लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतल्या लष्करी रुग्णालयात जाऊन भारतीय हवाई दलाचे मार्शल अर्जन सिंग यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. सिंग यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. पंतप्रधानांनी त्यांच्या कुटुंबियांचीही भेट घेतली आणि मार्शल लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना केली.

“भारतीय हवाई दलाचे मार्शल अर्जन सिंग यांना पाहण्यासाठी रुग्णालयात गेलो होतो. त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांचीही भेट घेतली.

भारतीय हवाई दलाचे मार्शल अर्जन सिंग लवकर बरे व्हावेत, यासाठी आम्ही सर्व प्रार्थना करत आहोत. डॉक्टर्स सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत”, असे पंतप्रधानांनी ट्विट केले आहे.

B.Gokhale/S.Kakade/D.Rane