नवी दिल्ली, 17 मे 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारतीय स्पर्धा आयोग (सीसीआय) आणि इजिप्शियन स्पर्धा प्राधिकरण (ईसीए) यांच्यातील सामंजस्य कराराला मान्यता देण्यात आली.
अंमलबजावणी धोरण आणि उद्दिष्टे:
माहितीची आणि सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण तसेच विविध क्षमता वाढीच्या उपक्रमांद्वारे स्पर्धा. कायदा आणि धोरणातील परस्पर सहकार्याला प्रोत्साहन देणे आणि ते अधिक बळकट करणे हे या सामंजस्य करारामध्ये अपेक्षित आहे. या सामंजस्य कराराचा उद्देश सीसीआय आणि ईसीए यांच्यातील संबंध अधिक मजबूत करणे आणि अनुभव सामायिकरण आणि तांत्रिक सहकार्याच्या माध्यमातून आपापल्या कार्यक्षेत्रात स्पर्धा कायद्याच्या अंमलबजावणी करणे आणि परस्परांच्या अनुभवातून शिकणे आणि अनुकरण करणे आहे.
परिणाम :
या सामंजस्य करारामुळे सीसीआयला इजिप्तमधील त्याच्या समकक्ष स्पर्धा एजन्सीच्या अनुभवांचा फायदा होईल तसेच त्यांचे अनुकरण करणे आणि शिकणे शक्य होईल परिणामी सीसीआयला स्पर्धा कायदा, 2002 च्या अंमलबजावणीत सुधारणा करायला मदत होईल. याचा मोठ्या प्रमाणात ग्राहकांना फायदा होईल तसेच भांडवल आणि सर्वसमावेशकतेला चालना मिळेल.
पार्श्वभूमी:
स्पर्धा कायदा, 2022 च्या कलम 18 नुसार सीसीआयला कोणत्याही परदेशातील कोणत्याही एजन्सीशी आपले कर्तव्य पार पाडण्याच्या किंवा कायद्यांतर्गत आपले कार्य पार पाडण्याच्या उद्देशाने कोणतेही करार किंवा व्यवस्था करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार, सीसीआय आणि ईजीए दरम्यानचा हा सामंजस्य करार सुसंगत आहे.
Jaydevi PS/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai