पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतीय विमानतळ प्राधिकरणाला 11.35 एकर जमीन हस्तांतरीत करायला मंजुरी दिली आहे. पाटणा विमानतळाची प्रस्तावति जमीन विमानतळाचा विस्तार आणि नवीन टर्मिनल इमारत बांधण्यासाठी वापरली जाईल. जमिनीच्या हस्तांतरणाला राज्य सरकारने देखील तत्वत: मंजुरी दिली आहे. नवीन टर्मिनल इमारतीची क्षमता वार्षिक 30 लाख प्रवासी इतकी असेल.
B.Gokhale/S.Kane/Anagha