पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (सुधारणा) विधेयक, 2017 ला मंजूरी दिली.
सुधारणा विधेयकामुळे भारतीय माहिती तंत्रज्ञान डिझाईन आणि वस्तुनिर्माण संस्था (आयआयआयटीडीएम), कुर्नल तसेच इतर आयआयटींचा समावेश मुख्य कायद्यात होईल. याचबरोबरबर आयआयआयडीएम कुर्नुलला विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्याच्या अधिकारासह राष्ट्रीय संस्थेचा दर्जा जाहीर केला आहे.
आयआयटीडीएमच्या कार्यान्वयन खर्च मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या योजना निधीतून केला जाईल.
उद्योग जगत आणि अर्थव्यवस्थेची वाढती गरज लक्षात घेता, संस्थेच्या प्रशिक्षित उमेदवारांकडूनच कुशल तांत्रिक मनुष्यबळ अपेक्षित आहे. या संस्थेत प्रवेश घेण्यासाठी लिंग, जात, पंथ, अपंगत्व, निवासस्थान, जातीयता, सामाजिक किंवा आर्थिक बंधन नाही.
B.Gokhale/S.Mhatre/Anagha