Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारतीय परराष्ट्र सेवा अधिकारी प्रशिक्षणार्थीनी घेतली पंतप्रधानांची भेट

भारतीय परराष्ट्र सेवा अधिकारी प्रशिक्षणार्थीनी घेतली पंतप्रधानांची भेट


सध्या परराष्ट्र सेवा संस्थेत प्रशिक्षण घेत असलेल्या भारतीय परराष्ट्र सेवेतील 39 अधिकारी प्रशिक्षणार्थींनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भारताच्या समृद्ध इतिहास, संस्कृती आणि परंपरांना अनुसरुन परदेशात भारताचे प्रतिनिधित्व करण्याच्या महत्वावर पंतप्रधानांनी अधिकारी प्रशिक्षणार्थींना संबोधित करतांना भर दिला. भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांनी केवळ सध्याच्या राष्ट्रीय प्राधान्याबाबतच नव्हे तर भविष्यातील राष्ट्र विकासाच्या गरजांबाबत जागरुक असायला हवे असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी अधिकारी प्रशिक्षणार्थींना तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी तसेच परराष्ट्र संबंधांमध्ये महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या समुदाय तसेच राज्य सरकारांसोबत चांगले संबंध ठेवण्याबाबत प्रोत्साहन दिले.

भूतानमधील दोन राजनैतिक अधिकारी जे सध्या परराष्ट्र सेवा संस्थेत प्रशिक्षण घेत आहेत, ते ही या समूहात सहभागी झाले होते.

B.Gokhale/S.Kane/D.Rane