भारतीय परराष्ट्र व्यवहार सेवेच्या 2014 आणि 2015 च्या तुकडीतल्या 64 प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
भारताचे जगाशी घनिष्ट संबंध वाढीला लागावे यासाठी पंतप्रधानांनी युवा अधिकाऱ्यांना प्रोत्साहन दिले यासाठी ज्या देशात या अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली असेल त्याची सखोल जाण विकसित करावी, जनते-जनतेमधल्या संवादाला आणि सांस्कृतिक बंध दृढ करण्यासाठी प्रोत्साहन दयावे, व्यापार, गुंतवणूक आणि तंत्रज्ञानविषयक बंध मजबूत करावे, परदेशातल्या भारतीयांचे कल्याण आणि हितरक्षणाकडे लक्ष पुरवावे असा सल्ला पंतप्रधानांनी दिला.
N.Chitale/S.Tupe/M.Desai
Met our young diplomats…officer trainees of the IFS. pic.twitter.com/BjgevKEzmN
— Narendra Modi (@narendramodi) April 5, 2016