Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारतीय तटरक्षक दलाच्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधानांकडून दलाच्या उल्लेखनीय सेवेची प्रशंसा


नवी दिल्‍ली, 1 फेब्रुवारी 2025

 

भारतीय तटरक्षक दलाच्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे शौर्य, समर्पण आणि देशाच्या विशाल किनारपट्टीच्या रक्षणासाठी दलाकडून अथकपणे बाळगण्यात येणाऱ्या सतर्कतेचे कौतुक केले आहे. सागरी सीमांच्या रक्षणापासून ते आपत्तीला प्रतिसादापर्यंत, तस्करी प्रतिबंधापासून ते पर्यावरणाच्या रक्षणापर्यंत प्रत्येक बाबतीत भारतीय तटरक्षक दल आपल्या किनारपट्टीचे भक्कमपणे रक्षण करून आपल्या सागरी प्रदेशाच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेची खबरदारी घेत असल्याचे मोदींनी म्हटले आहे. 

पंतप्रधान X वरील संदेशात म्हणतात;

“आज, त्यांच्या वर्धापन दिनी, आपण भारतीय तटरक्षक दलाचे शौर्य, समर्पण आणि अथक दक्षतेने आपल्या विशाल किनारपट्टीचे रक्षण करण्याच्या त्यांच्या कार्याचा गौरव करतो. सागरी सुरक्षेपासून आपत्ती प्रतिसादापर्यंत, तस्करी रोखण्यासाठीच्या कारवायांपासून ते पर्यावरण संरक्षणापर्यंत, भारतीय तटरक्षक दल आपल्या सागरी प्रदेशाचे अभेद्य रक्षक असून ते आपल्या सागरी प्रदेशाच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेची खबरदारी घेते. 

@IndiaCoastGuard”

 

* * *

JPS/M.Ganoo/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai