Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारतीय कृषी संस्थेची जमीन भारतीय पशुवैद्य परिषदेला हस्तांतरीत करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी


भारतीय कृषी संशोधन संस्था (आय ए आर आय), नवी दिल्ली यांच्याकडील दोन एकर जमीन भारतीय पशुवैद्यक परिषदेला (व्ही सी आय) हस्तांतरीत करण्याच्या प्रस्तावाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूरी दिली. व्ही.सी.आय ला ही जमीन 1 रुपया प्रति चौरस मीटर या दराने एकूण 8,01,278 रुपयांच्या एकूण भाडे रकमेवर 99 वर्षांकरीता भाड्याने देण्यात येणार आहे.

व्ही.सी.आय पशु विज्ञान क्षेत्रातील नवनवीन विषयांवर लघु अभ्यासक्रमांचे आयोजन करेल ज्यामुळे कार्यरत पशुवैद्यक व्यावसायिकांचे कौशल्य विकसीत होण्यासाठी मदत होईल. सुविधा उपलब्ध करुन दिल्यानंतर व्ही सी आय अतिरिक्त उपक्रम सुरु करेल आणि त्यापासून होणारे लाभ ग्रामीण लोकसंख्येपर्यंत पोहचवले जातील ज्यामुळे देशाच्या आर्थिक विकास आणि रोजगार निर्मितीत वृध्दि होईल.

B.Gokhale/S.Mhatre/V.Deokar